*पतांजली योग समितीचे प्रशिक्षण वर्ग*
*प्रमाणपत्र पत्र वितरण*
कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – कोरोना लाॅकडाऊनचे काळात सामान्य जनजीवन स्तब्ध असतांताना आरोग्य संपन्न नागरिकांन या संकल्पनेतून पतंजली योग समिती हरिद्वार व महिला पतंजली योग समिती पुर्व महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आॅनलाईन योग प्राणायाम प्रशिक्षण वर्गाचे प्रथम सत्राचे आयोजन 15जुलै ते 31ऑगस्ट पर्यंत संपन्न झाले होते। तर10 सप्टेबर पासून द्वितिय सत्राचे आयोजन करन्यात आले। या अंतरगत 100तासीका प्रत्यक्ष वर्ग, 100तासीका अभ्यास सत्र, व 100तासांचे प्रत्यक्ष मैदानी प्रयोग असे एकून 300तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले।प्रशिक्षणांती लेखी व प्रायोगिक परीक्षांचे आयोजन करन्यात आले होते।यात यशस्वी प्रशिक्षकांना प्रशस्ती पत्र ही देण्यात आले।
कोंढाळी येथील 40 प्रशिक्षणांर्थीना सध्या कार्यक्रमात येथील वैद्यक डा हरिभजन धारपुरे, वैद्यक दामोधर कडू यांचे प्रमुख उप स्थिती व पुर्व महाराष्ट्र महिला पतंजली योग समितीच्या राज्य प्रभारी शोभा भागिया, जिल्हा प्रभारी छाजुराम शर्मा, महिला पतंजलि जिल्हा प्रभारी उर्मिला जुवारकर, युवती प्रभारी सुरेखा नवघरे, वैशाली ठाकूर, राजेंद्र जुवारकर, विष्णु शर्मा यांचे हस्ते प्रशस्ती पत्र वितरण करन्यात आले।
या प्रशिक्षणादरम्यान अष्टांग योग, पंचकर्म, षटकर्म, मानव शिरिर रचना, अष्टचक्र गीता दर्शन, हठयोग आदिंचे सविस्तार माहिती देण्यात आली,
या प्रशिक्षणादरम्यान भारती शेंडे,पुजा पंचारिया, संजिवनी माने, गीता ईलमे, भारती पालीवाल, माधुरी शास्त्री ,रश्मि जोशी, महानंदा पाटील, मिनल कहारे यांनी धुरा सांभाळली, तर या कार्यक्रमाला यशस्वीतेकरीता स्थानिय पतांजली योग समितीचे प्रभारी गणेश चरडे, उत्तम गिडकर, प्रा सुनील सोलव, पप्पू शर्मा, निलेश गडकरी, चंद्रशेखर दरणे, सुधाताई कडू, छायाताई घाडगे, सोनम पांडे गोपाल सरोदे, प्रा सुनिल सोलव आदिंनी परिश्रम घेतले । संत गुलाब बाबा देवस्थान आश्रम कोंढाळी चे विस्वस्थ उमाकांत ठवळे पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला