Breaking News

*विदर्भ कल्याण प्रतिनिधीवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न* *पारशिवनी तालुक्यातील प्रकार*

*विदर्भ कल्याण प्रतिनिधीवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न*

*पारशिवनी तालुक्यातील प्रकार*

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

पारशिवनी – स्वस्थ धान्य दुकानाविरोधात वारंवार तक्रार व निवेदने तहसीलदार पारशिवनी यांना देऊनही होणारा गैरप्रकार तसाच सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही स्वस्त धान्य दुकानात कोणत्याही प्रकारची सुधारणा आलेली दिसून आली नाही.दुकानात होणारा काळाबाजार जनतेसमोर आणल्यामुळे दि.27/10/2020 ला दुपारी2 वाजताच्या सुमारास संबंधित दुकानदार निरंजन पहाळे व त्यांच्या दोन्ही मुलांनी विदर्भ कल्याण प्रतिनिधी श्री.बंटी जयस्वाल यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांना लोखंडी रॉड ने जीवे मारण्याचा प्रयत्न केला.इतकेच नव्हे तर सदर प्रतिनिधीने तलवार घेऊन आमच्यावर हल्ला केला अशी खोटी तक्रार देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली.व प्रतिनिधीला पोलीस स्टेशन मध्ये डांबून देखील ठेवण्यात आले होते.


सदर प्रतिनिधीने दुकानातील चालत असलेला काळाबाजार उघडकीस आणून दुकान दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावे ,याकरिता हा प्रकार घडून आला असावा असे वक्तव्य जनतेकडून केल्या जात आहे.सदर प्रतिनिधीच्या हाताला दुखापत असून सुद्धा पोलिसांकडून एकतर्फी कारवाही का केली गेली?हा प्रश्न देखील जनतेकडून विचारल्या जात आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …