Breaking News

*नदीत बुडून तरूणाचा मृत्यु ; मोवाड येथील घटना*

*नदीत बुडून तरूणाचा मृत्यु ; मोवाड येथील घटना*

नरखेड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

मोवाड- येथील एक तरूण नदीत बुडून मृत्यु पावल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. अचानक तरूणाच्या मृत्युने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन मृत्युचे कारण अद्याप कळु शकले नाही. याप्रकरणी मोवाड पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे. मुलगा हा मोवाड नगरपरीषद कार्यालयात कनीष्ट लिपीक या पदावर कार्यरत होता, त्यामुळे पोलीसांसमोर घटनेचे गांभीर्य तपासण्यासाठी आव्हानात्मक भुमीका बजावावी लागणार आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मोवाड येथील रहीवाशी मृतक विरेंद्र अशोक गजबे वय २५, हा मागील एक वर्षापासुन मोवाड नगरपरीषद कार्यालयात कनिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होता. घटनेच्या दीवशी ( ता ६) ला सकाळी ७=३० च्या सुमारास विरेंद्र हा घरून बाहेर गेला असता त्याचा लहान भाऊ मनीष व त्याची आजी शांताबाई हे झोपेतच होते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास सगळे झोपेतुन ऊठल्यावर आजी शांताबाईने विरेंद्र कुठे गेला असल्याची विचारपुस केली असता तो बाहेर गेला असल्याचे इतरांनी सांगीतले.
त्यानंतर सकाळी ९ वाजता त्याचा लहाण भाऊ शेतामध्ये कामावर गेला. व त्याच दीवशी विरेंद्र न. प. कार्यालयात का आला नाही, व त्याचा फोनही लागत नाही म्हणुन गावातील एका इसमाने नातेवाईकाला फोन करून विचारपुस केली त्यानंतर त्याच्या घरच्यांनी गावात दीवसभर शोधाशोध सुरू केली, मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. त्याच्या लहाण भावाच्या म्हणण्यानुसार त्यानेही विरेंद्रला वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोनच लागत नव्हता असे पोलीस सुत्राकडुन कळले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …