*शेतकर्यांना हेक्टरी 50000 रुपये मदत द्या किवा सामुहीक आत्महत्या करण्याची परवानगी द्या*

*शेतकर्यांना हेक्टरी 50000 रुपये मदत द्या किवा सामुहीक आत्महत्या करण्याची परवानगी द्या*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा या मागणीकरिता मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे वरोरा यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची दैना मायबाप ठाकरे सरकारला कळावी याकरिता मनसेच्यावतीने वरोरा तहसील कार्यालय परिसरात गळफास आंदोलन करीत निदर्शने देखील करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून सातत्याने नापिकीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न शासनापुढे असून देखील त्यावर अद्याप ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही .कागदी पंचनामे व अत्यल्प मदत यापलिकडे कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही .ओला दुष्काळ ,कोरडा दुष्काळ शेती पिकावरील रोग ,बनावट बियाणे, शेतीला वीज पुरवठा नाही आदी सर्व समस्यांमुळे कारणांमुळे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे.
चालू शेती हंगामात देखील शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागतो आहे. अतिवृष्टीत ,बोंड अळी मुळे सोयाबीन व कापसाच्या पिकांचे पूर्णता नुकसान झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच वरोरा भद्रावती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कापूस हे वार्षिक उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे .अतिवृष्टी पिकांवरील रोग यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादनामध्ये 90 टक्के घट झालेली आहे .शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रमुख प्रश्न पडला आहे .या वर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघालेला नाही .जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण हालाखीची परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या ही मागणी मनसेच्या वतीने
शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आलेली आहे .

यावेळी मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी गळयमध्ये गळफास लावत सरकारचा तीव्र निषेध देखील केला.तहसील परिसरात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली .यावेळी मनसे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भोयर.प्रशांत जुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे.राहुल खारकर तालुका अध्यक्ष, गौरव मेले तालुका अध्यक्ष मनवीसे ,उपसरपंच पिपरी संदीप कुठेमाठे ,प्रशांत बदकी उपाध्यक्ष मनवीसे, आकाश काकडे, सुधाकर गुरनुले, कृष्णा डोरलीकर , साजिद पठाण , रोहित केशववार ,उमेश जीवतोडे ,इत्यादी शेतकरी बांधव,ब मनसैनिक उपस्थित होते

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …