Breaking News

*शेतीच्या वादातून युवकाची हत्या*

*शेतीच्या वादातून युवकाची हत्या*


वरोरा प्रतिनिधि – मुजम्मील शेख
वरोरा – तालुक्यातील बोर्डा गावातील रहिवासी असलेला शेखर नथु सरोदे उर्फ सन्नी सरोदे ,(32 वर्ष ) यांची शेती सागरा वाघेडा या भागात आहे.शेतातील सोयाबीन चे पीक घेतल्यानंतर शेतात हरभरा पेरला, त्यामुळे शेतात काटेरी कुंपणाचे काम सुरू होते . शेतीच्या जागेवरून वाद निर्माण झाला.या वाद गंभीर झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी तरुणाला शेतातच लाकडी काठीने मारहाण केली त्यात तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे .तरुणाचा मृतदेह विहिरीच्या जवळ फेकून आरोपींनी पळ काढला .या घटनेतील आरोपी प्रफुल गुलाब सरोदे सागरा गावातील आणि एक वरोरा येथील खांजी वॉर्ड येथील विशाल आगलावे असल्याची माहिती कळते .या दोन्ही आरोपींनी पोलीस ठाण्यात येऊन जमा झाले आहे.मृतक शेखर सरोदे याचा विशाल आगलावे सोबत या आधीही वाद झाला असल्याची माहिती कळते. मृतक सन्नी सरोदे च्या मागे मुलगा ,6 महिन्याची मुलगी,पत्नी व आई वडील असा कुटूंब आहे .घरातील करता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास शेगाव पोलीस चौकी चे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे आहे.तपास अधिकारी पुढील तपास करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …