Breaking News

*शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- राहुल हटवार*

*शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- राहुल हटवार*

मौदा प्रतिनिधि – संजय गिरडे

मौदा- तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच धान पिक ऐन भरावर असताना तुडतुड्या या रोगाने अनेक शेतकऱ्याचे उभे पीक नष्ट झाले तर वादळी पावसाने धान पीक जमिनीवर लोळून सम्पूर्ण नुकसान झाले आहे त्यामुळे आज शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे त्यामुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मौदा येथील शेतकरी राहुल हटवार यांनी केली आहे याबाबत हटवार यांनी माजी मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिली असून आपण याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले मौदा तालुक्यात धान आणि मिरची हे प्रमुख पीक असून यावरच शेतकऱ्याचे आर्थिक बजेट अवलंबून असते पण हे दोन्ही पिके गेल्यामुळे शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे.


दुसरीकडे मौदा तालुक्यात अनेक कम्पन्या बंद पडल्या आहे तर काही कँपन्यांनी कामगार कमी केले आहे या कम्पन्या मध्ये अनेक शेतकऱ्याची मुले कामगार म्हणून काम करत असत परंतु एकीकडे शेतीतील पीक हातचे गेले तर दुसरीकडे कम्पन्या बंद होत आहे त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी समस्या बिकट होत आहे असे मत हटवार यांनी वेक्त केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …