Breaking News

*ताई तेरे सन्मान में भाजपा युवा मोर्चा मैदान में* *तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन*

*ताई तेरे सन्मान में
भाजपा युवा मोर्चा मैदान में*

*तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना निवेदन*

 

नरखेड प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – गृहमंत्री, पालकमंत्री राजीनामा द्या..
दोषींना फाशी द्या या घोषणा देण्यात आल्या.  दिशा कायदा तात्काळ लागू करा..आज ची परिस्थिती पाहता *बेटी बचाव बेटी पढाव* चे नारे दिले जातात व दुसरी कडे काही आमाणुष वुतीचे लोक हे मुलीन वर जबरदस्तीने शारीरिक व लैंगिक अत्याचार करता यांना कठोरत कठोर शिक्षा व्हावीत या साठी **दिशा* कायदा लवकरात लवकर पारीत होणे हे काळाची गरज आहे.या साठी भारतीय जनता युवा मोर्चा कडून नरखेड तालुक्यातील बेलोना(हेटी) येथील १३ वर्ष्याच्या चिमुकलीवर घडलेली बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे, वासनेने भरलेल्या नराधमांना कायद्याचे भय राहले नाही.या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर/फाशी ची शिक्षा व्हावी आणि पीडित आमच्या बहिणीला न्याय मिळावा.यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा कडून तहसील कार्यालयात येथे निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी तहसीलदारांन मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.प्रशासनाने जनतेच्या आक्रोशाचा उद्रेक होईल अशी वाट ना पाहता महाराष्ट्रात मिशन मोड वर पाठपुरावा करून राज्यात दिशा कायदा अमलात आणावा.जेणेकरून पीडित बहिणीला न्याय मिळेल.अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा कडून करण्यात आली.. यावेळी युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष आदर्श पटले, जिल्हाउपाध्यक्ष मयूर दंढारे,तालुकाध्यक्ष स्वप्नील नागापुरे, कार्याध्यक्ष अक्षय विरखडे,दिलेशभाऊ ठाकरे,मंत्री राहुल चौहान,हेमंतभाऊ काळे,निखिल कंठाने,पवन , कळंबे,चेतन ठोंबरे,भुषण कठाणे,रवि मुरोडिया.प्रशांत देशमुख, दिनेश बोकडे, सागर मुंने,राजू पाठे,निरंजन, अनिकेत सातांगे,निलेश सोनारे आणि भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …