Breaking News

*रामटेक येथे सिटु व किसान सभेचे धरणे आंदोलन*

*रामटेक येथे सिटु व किसान सभेचे धरणे आंदोलन*

 

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी

रामटेक- सिटु अंतर्गत येणाऱ्या आशा व गटपर्वतक कर्मचारी युनियन , अखिल भारतीय किसान सभा व अंगणवाडी कर्मचारी संघटना (आयटक) च्या वतीने रामटेक तहसिल कार्यालयासमोर संविधान दिनी संयुक्त धरणे आंदोलन केले गेले. 26 नोव्हेंबर संविधान दिनी देशातील बहुतांश शेतकरी व कामगार संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला होता त्याचाच भाग म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात आला. आंदोलनात मोठया संख्येने आशा, अंगणवाडी व शेतकरी सामील होते.


आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्या ना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन द्या, कामगार कायद्यातील बदल रद्द करा, नवीन शेतकरी कायदे रद्द करा, मनरेगा मध्ये 200 दिवसाच काम द्या, महागाई वर आळा घाला, सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, आयकर न भरणाऱ्या सर्व जनतेला दरमहा 7500 रुपये आर्थिक मदत करा, रोजगार निर्मिती करा या प्रमुख मागण्या आंदोलनाच्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे कॉ. राजू हटवार, आयटक चे ऍड. आनंद गजभिये, सिटु ची कॉ. कल्पना हटवार यांनी केले. नीता भांडारकर, वर्षा वानखेडे, भीमराव गोंडाने, पुष्पां ठाकरे, छाया शेंडे, मंदा चौधरी, विजय कश्यप सहित अनेक कामगार व शेतकरी सामील झाले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …