*सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांच्या जयंती निमित्त आदर्श विद्यालयात रक्तदान शिबीर व कोव्हिड चाचणी शिबीर संपन्न
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान- कॅबिनेट मंत्री सुनिल केदार*
पाटणसावंगी विशेष प्रतिनिधि
नागपुर / पाटणसावंगी- रक्तदान करणा-या व्यक्तिचे सामाजिक योगदान मोठे असते. मानवीय सामाजिक नाते निर्माण करून रक्तदाता दुस – याला जिवदान देत असतो . हिच त्याची सामाजिक बांधिलकी असते . रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे . रक्तदात्याकडून इतर व्यक्तिनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास , किडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले . तालुका युवक काँग्रेस कमेटी आणि श्री गणेश प्रासादिक शिक्षण संस्था संचालित स्थानिक आदर्श विद्यालय व स्व. आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या जयंती पर्वावर रक्तदान शिबीराचे आणि कोव्हिड चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी संस्था पदाधिका-यांनी मा.सुनिल केदार यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. राज्यशासनाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या कोव्हिड चाचणी शिबीरात १८६ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या सर्व गावातील माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोव्हिड चाचणी मेयो हॉस्पिटलच्या तज्ज डॉक्टरांनी आणि त्यांच्या चमुने केली.
या कार्यक्रमात संस्था सचिव मा. सुहासताई केदार, सहसचिव मा. सुधिरभाऊ केदार , संस्था सदस्य गजाननरावजी बंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री . मनोहरराव कुंभारे, सौ. संध्याताई ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य मुक्ता कोक्कडे, पं.स. सदस्य श्री. रमेश हाडके, माजी सरपंच श्री. अजय केदार, संस्था संचालक श्री.जानरावजी केदार, श्री. अनिल राय, श्री. मधुकर निमजे, ना जि.ग्रा.यु. काँग्रेस अध्यक्ष राहूल सिरिया, श्री . दिलीप केदार , श्री . इश्वर झोड , श्री. आनंदराव साबळे , श्री. रविंद्र पखिडे, श्री. देवा मिलमिले, मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . मा . सुनिल केदार भाषणात पुढे म्हणाले , “ कोरोणा काळात कार्य करणारे डॉक्टर , पोलीस , शिक्षक , नर्स , सफाई कामगार , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि इतर कर्मचारी यांचे मोठे सामाजिक योगदान असल्याने मी त्यांचे आभार मानतो . कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका ललिता कनोजे यांनी केले . आभार संस्था सचिव मा. सुहासताई केदार यांनी मानले .