Breaking News

*भाजपचे पदवीधर नागपूरचे उमेदवारा महापौर संदीप जोशी यांचा विजय निश्चितच…!* *अविकसित काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी माझी – संदीप जोशी*

*भाजपचे पदवीधर नागपूरचे उमेदवारा महापौर संदीप जोशी यांचा विजय निश्चितच…!*

*अविकसित काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी माझी – संदीप जोशी*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़- निवडणुकीच्या जाहीरणाम्यापेक्षा वचननामा यावर माझा दृढ विश्वास आहे. वचननामा २४ तास नजरे समोर ठेवून त्याची अमलबजावणी हा माझा धर्म मानतो.
गेल्या अनेक वर्षापासून विकासपासून वंचीत असलेल्या काटोल- नरखेड विधानसभा क्षेत्र दत्तक घेवून विकसीत केल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी माझी राहील असे अभिवचन लक्ष्मीकमल मंगल कार्यालय काटोल येथील आयोजित प्रचार सभेत संदीप जोशी यांनी दिले.
ते पुढे असेही म्हणाले की, शिक्षक पदवीधर विविध समस्यांवर त्यांनी उकल करताच 2005 नंतरच्या पेंशन संबंधीचा प्रश्न सोडविण्यासाठी जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही अशी गवाही जोशी यांनी दिली.


आयोजित प्रचार बैठकीत माजी जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार, संघटन महामंत्री किशोर रेवतकर, जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, उकेश चव्हाण, नगराध्यक्षा वैशालीताई ठाकूर, उपाध्यक्ष तथा सिनेट मेंबर सुभाष कोठे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे, काटोल शहर अध्यक्ष जितेंद्र तूपकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र सरोदे, अड दीपक केने, दिलीप ठाकरे, हेमराज रेवतकर उपस्थित होते.
सभेचे संचालन प्रा. देविदास कठाणे यांनी केले तर आभार विजय महाजन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू चरडे, किशोर गाढवे, तानाजी थोटे, लक्ष्मीकांत काकडे, सोपान हजारे, आकाश मेश्राम, अनिकेत अंतुरकर आदी यांनी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …