Breaking News

*नागपूर -जबलपूर महामार्गावर भीषण अपघात ; 1 ठार तर 1 जखमी*

*नागपूर -जबलपूर महामार्गावर भीषण अपघात ; 1 ठार तर 1 जखमी*

रामटेक प्रतिनिधी – पंकज चौधरी

रामटेक – काल सायंकाळी नागपूर -जबलपूर महामार्गावर असलेल्या कान्द्री माईन या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.सदर मृत व्यक्ती दशरथ राऊत वय वर्षे 35 रा.मनसर माईन .व जखमी तरुण सुजित नेवारे वय वर्षे 23 रा.कान्हादेवी असे आहे.घटनेचा क्रम असा की,सुजित आणि दशरथ हे दुचाकी क्र. MH 40 E 8955 नागपूर -जबलपूर महामार्गाने सायंकाळी 6.00 ते 6.30 च्या दरम्यान पवनी देवलापार कडे जात होते.दरम्यान कान्द्री माईन जवळ मागेहून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकी
ला जोरदार धडक दिली.यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुचाकी समोरून येणाऱ्या innova कार वर आदडली.यात मागे बसून असलेल्या दशरथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल करण्यात आले .पण उपचारादरम्यान दशरथ राऊत यांची मृत्यू झाली.व जखमी तरुणाचे उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचार सुरू आहे.सदर घटनेस्थळी मनसर पोलिस यांनी पंचनामा करून अपघात असल्याचे सांगितले आहे.मृत व्यक्तीची घरची परिस्तिथी गरीब असून त्यांच्या मागे पत्नी ,1 मुलगा आणि 1 मुलगी आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …