*पेच जंगलामध्ये ट्रॅक्टर पलटून पंचवीस ते तीस मजूर गंभीर जखमी*

*तोतलाडोह मार्गावरील माथाल टेक जंगल शिवारातील घटना*

*ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर होते*
देवलापार प्रतिनिधी – पुरुषोत्तम डडमल
देवलापार – सोमवार ३०नोव्हेबर ला पो.स्टे.देवलापार परीसरातील फिर्यादी यांनी पो.स्टे.ला येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, सकाळी ८:३०ते ९ वाजताच्या दरम्यान जंगलातील गवत कटाई चे काम करण्यासाठी खापा गावातील मजूर अंबाखोरी येथे ट्रॅक्टरने वनमजुर घेवुन जात असतांना तोतलाडोह रस्त्यावरील माथाल टेक जंगल शिवारामध्ये ट्रक्टर चालक नामे मनोहर कुंभरे राहणार खापा याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालवुन ट्रॅक्टरचा अपघात घडवुन आनला व ट्रॉलीमध्ये बसलेले सर्व महिलांना मजूर गंभीररित्या जखमी करण्यास कारणीभुत ठरला आहे अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे.देवलापार येथे अप क २१५/२० कलम २७९ ,३३७ ,३३८भादवी सह कलम १८४ मोवाका अन्वये आज ३० नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु घटनेच्या वेळी ट्रक्टर मध्येे ३० ते ४० मजूर लादून जंगलात कामाकरिता वाहतूक करून जात होते. जात असतांनाच तोतलाडोह रस्त्यावर असलेल्या माथाल टेक जंगल शिवारात ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून हा भीषण अपघात झाला. यात २५ते३० मजूर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकार मंगेश ताटे व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतू अधिकारी पोहचण्याआधीच सफारीला जाणाऱ्या पर्यटकांनी जखमी मजुरांना बाहेर काढून उपचाराकरिता देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.यातील १०ते १२ गंभीर जखमींना रामटेक च्या रुग्णालयात हलविण्यात आले. तर १५ते २०जणांना देवलापार येथे उपचार करण्यात येत आहे.

याबाबत ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी सांगितले की,अद्याप ही ट्रॅक्टर मालकाचा पत्ता लागलेला नाही तसेच ट्रॅक्टर विना नंबरचा होता हा ट्रॅक्टर ठाण्यात जमा करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखुन देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे, सापोउपनि केशव पुंजरवाड, परिपोउपनि लक्ष्मी घोडके हे त्यांचे पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे दाखल झाले व त्या बाबतची माहीती उप विभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांना देण्यात आली.तसेच आरोपी नामे मनोहर कुमरे हा घटनास्थळी मिळुन न आल्याने त्याचा शोध घेवुन अटक करण्याची तजविज ठेवण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे .
Maharashtra News Media सच की आवाज