Breaking News

*गडचिरोली तालुक्यात शिवसेनेच्यावतीने भगवा पंधरवाडा* *’गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे शिवसैनिक’ तथा सदस्य नोंदणी अभियान राबविनार* *जिल्हयात शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात भगवा फड़कविन्याची तैयारी*

*गडचिरोली तालुक्यात शिवसेनेच्यावतीने भगवा पंधरवाडा*

*’गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे शिवसैनिक’ तथा सदस्य नोंदणी अभियान राबविनार*

*जिल्हयात शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात भगवा फड़कविन्याची तैयारी*

 

गड़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

अमिर्झा/गड़चीरोली – दिनांक 28/12/2020 पासून गडचिरोली तालुक्यात जिल्हा शिवसेनेच्यावतीने मा. शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात भगवा पंधरवड़ा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्य मौजा अमिर्झा येथे सभा घेवून जनतेच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना ‘गाव तिथे शाखा’, ‘घर तिथे शिवसैनिक’ तथा सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी संपर्क प्रमुख मा. किशोर पोतदार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार जनकल्याणकारी कामे करीत आहेत. मा. मुख्यमंत्र्यानी आखलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे, यासाठी ते आग्रही आहेत. त्यामुळे याचा पाठपुरावा शिवसैनिकानि करत राहावा, असे आवाहन पोतदार यांनी केले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, शिवसेना सत्तेत असो किवा नसो; पण जनतेच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी लढणारा आपला पक्ष आहे. जनकल्याण करण्यासाठी लढण्याचे संस्कार मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिले आणि त्याचे तंतोतत पालन करून आम्ही शिवसैनिक समाजकार्य करीत आहोत, असे कात्रटवार यांनी स्पष्ट केले.

जिल्हा संघटक विलास(बाबुजी) कोडाप म्हणाले, शिवसेनेची व शिवसैनिकाची आतापर्यंत ची वाटचाल पुढील काळात येणाऱ्या संपूर्ण निवडणूकीच्या विजयाची नांदी असेल, अशे बाबुजी कोडाप म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी मा. गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,जिल्हा संघटक विलास (बाबुजी)कोडाप तालुका प्रमुख गजानन नैताम, उपतालुकाप्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख ज्ञनेश्वर बागमरे, गणेश दहलाकर, निकेस लोहबरे, राहुल सोरते राहुल नागापुरे,हिवराज रानडे,बालाजी वकडे, दिनेश नारनावरे,आशीष वाकड़े, श्रीकांत रानडे,महेश बबनवाड़े,सौरभ कुकडकर, दिनेश रानडे,यांच्या सह शेकडो शिवसैनिक व गावकारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …