Breaking News

*नरखेड तालुकात भाजपा ,पंचायत समिती व खेडी (खुर्द) गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन*

*नरखेड तालुकात भाजपा ,पंचायत समिती व खेडी (खुर्द) गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 1956 महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रज सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचे मजुर खात्याचे कार्यक्षेत्र असो किंवा बांधकाम खात्याचे कार्यक्षेत्र, स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचे विधी खात्याचे कार्यक्षेत्र असो,स्वतंत्र भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटना निर्मितीचे कार्यक्षेत्र असो,अस्पृश्यो उद्धारक समाज सेवेचे कार्यक्षेत्र असो, राजकारणाचे कार्यक्षेत्र असो किंवा ग्रंथलेखनाचे कार्यक्षेत्र असो,आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या महान व्यक्तीमत्वाचा, थोर कर्तृत्वाचा, प्रचंड ज्ञानाचा, अविश्रांत परिश्रम शिलतेचा, भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या दूरदृष्टीचा,आदर्श व एकनिष्ठ राष्ट्रीभक्तीचा, जनहीतकारी व देश हितकारी थोर थोर विचारांचा संस्मरणीय ठसा कायम अधोरेखित केला आहे आज महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन त्या निमित्त त्यांना व त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …