Breaking News

*वरोरा शहरात भरदिवसा रेतीच्या ट्रॅक्टर ने अभ्च्यांकर वॉर्ड मध्ये उडवले* *ह्या घटनेचा निषेध म्हणून तहसील कार्यालयाला मनसे तालुकाध्यक्ष वैभव डाहने यांनी लॉक लावले*

*वरोरा शहरात भरदिवसा रेतीच्या ट्रॅक्टर ने अभ्च्यांकर वॉर्ड मध्ये उडवले*

*ह्या घटनेचा निषेध म्हणून तहसील कार्यालयाला मनसे तालुकाध्यक्ष वैभव डाहने यांनी लॉक लावले*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – अभ्यांकर वार्ड येथील स्नेहनगर चौकात असणाऱ्या वळणावर भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक MP34 AA 4690 ने दुचाकी MH31 CZ 3111 वाहनावरून येत असलेल्या दोन युवकांचा गंभीर अपघात घडला. प्रवीण खोब्रागडे वय 22 वर्ष गंभीर जखमी असून चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर मंथन बावणे यांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या आत दुचाकी वाहन फसले होते यामध्ये एकाचा पाय ट्रॅक्टरच्या चाकाच्या खाली आले होते. घटनास्थळी वार्डातील लोकांनी समयसूचकता दाखवून ट्रॅक्टर पुढे करून युवकाला ट्रॅक्टरच्या खालून काढण्यात आले. लगेच जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर युवक हे मोटर ड्रायव्हिंग स्कूल येथे महिनाभरापासून प्रशिक्षण घेत होते त्यांचा आजचा शेवटचा दिवस असल्याने लायसन मिळविण्यासाठी हे युवक आनंदात नातेवाइकांच्या घरून निघाले होते.
या प्रकरणातील अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मध्ये अवैध रेती भरून असल्याने भरधाव वेगाने जात होते. हा प्रकार नेहमीच या परिसरातून सकाळी सुरू असतो. सदर ट्रॅक्टरवर दिलीप घोरपडे ट्रॉलीवर लिहून असल्याने हे ट्रॅक्टर भाजपाचे विद्यमान नगरसेवकाचेच असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. घटना घडताच चालकाने या ठिकाणावरून पळ काढला. या वाहना वरती मध्य प्रदेश येथील वाहन क्रमांक नोंदवलेला असून बऱ्याच दिवसापासून ते वाहन अवैध रेती वाहतुकीचे कामात सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहरातील अशा बऱ्याच वाहनाचे परवाने तपासण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी घटनास्थळावर आले. जागीच पंचनामा करून ट्रॅक्टर व दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. यासंबंधातील पुढील तपास वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे करत असून वरोरा शहरात अवैध रेती व मुरूम वाहतुकीवर लगाम लावण्याची गरज आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …