*विदर्भ राज्य आंदोलन समिति व शेतकरी संघटना यांचे संयुक्त वाढीव विज बिलाच्या विरोधात ठिय्या आंदोलन व निदर्शने*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – 7 डिसेबश्रर 2020 रोज सोमवारला विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या आव्हानावरुन नरखेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने बस स्टॉप चौक नरखेड येथे शेतकरी संघटना नागपुर जिल्हा उपाध्यक्ष . नारायणराव बांदरे विदर्भ राज्य आंदोलन समिती नरखेड तालुका युवा संघटक प्रशांत तागडे यांच्या नेतृत्वात वाढीव विज बिलाच्या विरोधात ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी महात्मा गाँधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महात्मा गाँधी यांना साकडे घालून आंदोलनास सुरुवात करण्यात आली . कोरोना शेतकऱ्यांला कापसाचे उत्पादन झाले पण योग्य भाव मिळाला नाही.
अतिपावसाने” सोयाबीन पेरली पण लाखाची व उत्पादन झाले नाही हजाराचे ” अशी अवस्था झाली.सध्या संत्राया फळाला माती मोल भाव आहे.यामुळे आथिर्क बाजुने शेतकऱ्यांचे पुर्णतः कबरडे मोडलेत त्यात आवाका सावा विजबिल हा पुन्हा आथिर्क भुरदड म्हणून महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातील विज बिलातुन विद्युत् ग्राहकांची मुक्तता व्हावी व शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची विद्युत २४ तास द्यावी, रात्रीचे भारनियमन बंद करावे ,विदर्भातील सर्व विद्युत् ग्राहकांना २०० यूनिट पर्यंत विज मोफत द्यावी , विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई २५००० रु प्रति हेक्टर सरसकट द्यावी आणि स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित निर्माण करा अशा प्रमुख मागण्या यावेळी विदर्भवादी आंदोलकांनी केल्या.
यावेळी वसंतराव वैद्य , रामचंद्र बहरूपी भाउराव नासरे, दिगांबर चक्रपाणी, शंकरराव घोगरे, प्रभाकरजी बेले , पुरुषोत्तमराव हेलोंड़े, गजाननराव बालपांडे , शंकरराव बहुरूपी, अंकुश धुर्वे , देवांशु भिसे , बाबाराव मुंदाफळे, गोलू चक्रपाणी , रूपम मुंदाफळे, प्रज्वल धुर्वे, भगवंतराव हेलोंडे, पंढरी मोहोड यांसह अनेक विदर्भवादी आणि शेतकरी संघटने चे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज