*बोड़अळी, व खोड़कीडांच्या प्रादुर्भावाने नष्ट झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करुण सरसकट मोबदला द्या…*

*पिडीत शेतकर्यांची आर्तहाक,मुख्यमंत्री, कु्षीमंत्र्यासह मत्रीं महोदयांना निवेदने*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत तालुका प्रतिनिधी रवी काळबांडे*
*सावनेरः सावनेर तालुक्यातील बोंडअळी व खोडकीड़ पीडित शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे सावनेर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, कु्षीमंत्री तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास व क्रिडा मंत्री सुनील केदार यांना सतिश लेकुरवाळे (ग्रामीण) तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वात तालुक्यातील नांदा,सालई,उमरी,केळवद, खुर्सापार,माळेगाव, जोगा,भागीमाहेरी सह तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊण सोयाबीन, कपाशी,संत्रा,मोसंबी व फळभाज्याचे झालेल्या नुकसानभरपाई चे तातडीने सर्वेक्षण करुन सरसकट मोबदला देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*
*तसे बघितले तर यावर्षीच्या सुरुवातीपासुनच कोरोना विषाणूंच्या थैमानामुळे लाँकडाऊन व रोजगाराच्या प्रश्न,अश्यात कसेबसे सावरत शेतकरी बांधवांनी आपआपल्या शेतीची मशागत करुण सोयाबीन, कपाशी, तुर,फळभाज्या आदि पारंपरिक पीकांची पेरणी केली परंतू निसर्ग कोपला व पावसाळ्यात दोन तीनदा झालेली अतिवृष्टी मुळे पीके करपली त्यातून सावरत नाही तर खोड़कीडा़चा हल्यात सोयाबीन, संत्रा,मोसंबी व फळभाज्याचेहपीक भुईसपाट झाले.अश्यात शेतकर्यांच्या उरल्यासुरल्या आशा कपाशीच्या पीकावर अवलंबून होती परंतू बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे एकरी पाच ते दहा क्विंटल कापुस होण्याऐवजी एक क्विंटल कापुस सुद्धा शेतकर्यांच्या पदरी पडला नाही व पुढे ही पडणार नाही अशी दैनिय अवस्था असुन कपाशिच्या झाडाला लागलेल्या प्रत्येक बोडा़त बोड़अळी व ते सडलेल्या स्थितीत असल्याने कु्षीअधिकारी म्हणतात पीक उपडून जाळून टाका*
*अश्या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांनी बी-बियाणे, खते,किटकनाशक, सोसायटीचे कर्ज,क्रँप लोन,मुलांचे शिक्षण,परिवाराचा उदरनिर्वाह व विवाहयोग्यमुला-मुलिंचे लग्न पुढे कसे होणार या विवेचनात संपूर्ण शेतकरी बांधव चिंतातुर झाला असुन पुढे काय होणार मायबाप राज्य सरकार या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी जर उभे राहीले नही तर त्याच्यावर गळफास अथवा किटकनाशकाचा घोट घेऊण आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही अशी सदु्ष्य स्थिती निर्माण झाली आहे*
*याकरिता राज्य शासनाने क्षेत्रातील झालेल्या कपाशी, सोयाबीन, तुरी,संत्रा,मोसंबी व फळभाज्यांच्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करुण पिडीत शेतकऱ्यांना सरसकट मोबदला उपलब्ध करुण द्यावे अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी सावनेर तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाळे, पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे,मनोज मीरजे,शालिकराम घोरमारे,शंकर मोवाडे, बाळू कोसरकार,शंकर टोंगे,गौतम पाटील, गजानन मिरचे,मनोहर घोरमारे, काशीराव पटे,श्रावण जोगी,योगराज डांगोरे,गुणवंत काळे,गुड्डू आचार्य, हिरामण क्षिरसागर, मेहर जोगी,किशोर बेलसरे सह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते*
*तालुक्यातील शेतकरी बांधवावर आलेल्या या बिकट परिस्थितीदा राज्य शासन कीतपत गांभीर्याने घेऊण त्यांना योग्य मोबदला उपलब्ध करुण देत शेतकरी बांधवानी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलु नये याकरिता प्रयत्न करते याकडे पीडित सर्व शेतकरी बांधव व त्यांच्या परिवाराचे लक्ष वेधले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज