Breaking News

*मिनीवाडा-मसाळा भागात जंगली डूकरांचा हैदोस* *तूर व कपाशी चे उभे पीक केले नष्ट* *शेतकरी हवालदिल* *संवेदनशील गावांच्या वन सीमेवर लोखंडी जाळी चे कुंपण उभारण्याची मागणी*

*मिनीवाडा-मसाळा भागात जंगली डूकरांचा हैदोस*

*तूर व कपाशी चे उभे पीक केले नष्ट*

*शेतकरी हवालदिल*

*संवेदनशील गावांच्या वन सीमेवर लोखंडी जाळी चे कुंपण उभारण्याची मागणी*

कोंढाळी प्रतिनिधि- दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर व लगतच्या संवेदनशील गावाच्या सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याचा निर्णय युती सरकारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी १४ऑगस्ट २०१९ ला घेण्यात आलेला होता, व या करीता निधीची ही तरतुदी करन्यात आली होती अशी माहिती आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वनविभागातर्फे वन्य प्राणी संरक्षण व संवर्धन या अनुषंगाने वन्यप्राण्यांना पुरेसे संरक्षण लाभेल परिणामी वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होईल. वाघ आणि बिबट्या राण डूकरे, नील गाय, सारख्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणामुळे संचार वाढ झाल्याने लगतच्या काही गावांमध्ये मनुष्य व त्यांची जनावरे आणि वन्य प्राणी यांच्यात संघर्षाच्या घटना घडल्या व घडत आहेत, काटोल तालुक्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्राच्या मिनीवाडा-मसाळा येथील जंगला सोबतच गावा लगतचे शेतीतील तूर कपाशी चे उभे पीक जंगली डूकरांनी उद्धवस्त केले आहे , खरे या भागात डूकरांचा व वाधांचा सतत वावर असल्याने विंग, बिबट यांचे कडून शेतकरी व गावकर्यांचे गायी, बैल, म्हनैं शिकार नित्याचेच झाले आहे । त्यामुळे वन सीमेवर योग्य त्या ठिकाणी लोखंडी जाळीचे कुंपण उभारून याबाबत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी कडून वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे .या करिता श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून वन सीमेवरील गावालगत साखळी जाळीचे कुंपण घालण्यात यावे अशी मागणी जि पण सदस्य सलील देशमुख यांनी केली आहे.या मागणी ची पूर्तता झाल्यास मनुष्यहानी व शेतकर्या चे पिकाचे व पाळीव प्राण्यांची नुकसान टाळण्यासाठी व लगतच्या गावच्या सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे,यातुन मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे ग्रामस्थांना पर्याय रोजगाराची संधी तसेच कुटीर उद्योग, गृह उद्योग ही मिळेल व नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे सोबतच गावांमधील संसाधनांचे उत्पादकता वाढविने यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून वना लगत गावातील वित्तहानी मनुष्य आणि टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो असेही मिनीवाडा चे उप सरपंच पदम पाटील डेहणकर, शेतकरी गणेश पाटील वानखेडे, यांनी सांगितले आहे।

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …