Breaking News

*सावनेर पं.स.येथे महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न* *शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा पोहचविणे हेच जनप्रतिनिधींचे कार्य* *सुनील केदार मंत्री महाराष्ट्र शासन*

*सावनेर पं.स.येथे महा आवास अभियान कार्यशाळा संपन्न*

*शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा पोहचविणे हेच जनप्रतिनिधींचे कार्य*

*- सुनील केदार मंत्री महाराष्ट्र शासन*

मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसिया

सावनेर : पंचायत समिती सावनेर येथे महा आवास अभियान अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पशु संवर्धन दुग्य विकास व क्रिडा मंत्री मा.सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.*

*कार्यशाळेस माननीय मंत्री महोदयांनी सर्वप्रथम वेळेच्या आत घरकुल निर्माण करणार्या पाच लाभार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊण सन्मानित करत अपूर्ण घरकुल बांधकाम, जलसंधारण, पेयजल योजना,शेतकऱ्यांना विद्युत जोडनी तात्काळ उपलब्ध होणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.*

*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत मंत्री महोदयांनी म्हटले की कोणत्याही शासकीय योजना राबविताना व त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळवूनदेण्यासाठी जनप्रतिनिधी व अधिकारी कर्मंचारी यांच्यातील समन्वय चांगला असल्याने त्या योजना यशस्वी ठरतात. माझ्या विधानसभा क्षेत्रातील मग ते जिल्हक परिषद सदस्य असो अथवा पंचायत समिती सभापती, सदस्य,नगर परिषदेचे नगर सेवक तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य व जनप्रतिनिधीं व तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या कर्त्याची जान ठेवून कार्य करतात याचा मला अभिमान आहे व मी मला माझ्या कार्यक्षेत्रातुन प्रत्येकाचे खुप प्रेम मीळाले आहे आज मला काही मीळावं ही इच्छा मनात उरली नाही.आता मला माझ्या कार्यक्षेत्राला त्याची परतफेड करायची आहे व ते मी याक्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून सदैव करत राहणार असे ठाम मत व्यक्त करित येणारे नववर्ष हे आपण आपल्या क्षेत्रात महिला सबळीकरण म्हणून लक्षात ठेऊन बचत गट तसेच सुशिक्षित अशिक्षित आई बहिणी करिता विविध योजना आखुन संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करण्याचे माझे धेय्य आहे व ते आपण सर्वांच्या सहकार्याने नक्कीच पुर्ण करु असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला*

*तर जिल्हा परिषद नागपुर च्या सभापती रश्मी बर्व यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की नागपुर जिल्ह्याला व आपल्याला सुनील भाऊ सारखे कर्तुत्ववान नेतृत्व लाभले असून मोठ्यात मोठ्या अडीअडचणी वेळीच सोडवून सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारे व्यक्तीमत्व आहे नागपूर जिल्ह्या परिषदेच्या सभापती यानात्याने जिल्यातील अडीअडचणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सोडवू असा विश्वास व्यक्त केला*

*तर जिल्हापरिषदेचे उप सभापती मनोहर कुंभारे यांनी याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात झालेल्या व होऊ घातलेल्या लोकाभिमुख कार्यांचा वु्तांत तसेच नियोजीत कार्यासंबधीची माहीती देत नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मा.मंत्री महोदयांच्या कुशल नेतृत्वात विरोधकांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडून हादरा देत आपल्या कौशल्याचा परिचय दीला.आज राज्यातच नव्हे तर केन्द्रीय पक्षश्रेष्ठींपर्यंत साहेबांच्या कार्याच्या गोष्टी होतात व या संधिचे सोनें करुन आपण आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनसमस्या नक्कीच सोडवू असा ठाम विश्वास व्यक्त केला*

*कार्यक्रमाची सुरुवात पशु संवर्धन दुग्ध व विकास क्रिडा मंत्री मा. मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सावनेर उपविभागिय अधिकारी अतुल मेहेत्रे, जि. प.नागपूरच्या अध्यक्षा मा.रश्मी बर्वे, बिडीओ दिपक गरूड, पं.स. सभापती अरूणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, गजानन जवादे, कार्यकारी अभियंता मा. हेमके, उप अभियंता मानकर, उपअभियंता गाठीबांचे, शाखा अभियंता दिनकर बिहारे, सहायक अभियंता मोहनिश सलोटे, अभियांत्रीकी सहायक संजय सावरकर, संगथक परिचालक वासदेवु चौधरी, अधिक्षक महेश राऊत, कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे सह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दिपक गरुड यांनी केले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …