*आर्वी- मोहिमे मध्ये प्रत्येक घरी जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे*

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे
वर्धा – संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम 2020
दिनांक 01 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे…..
डॉ. मोहन सुटे
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आर्वी
सदर मोहिमेमध्ये प्रत्येक घरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग बाबत माहिती देऊन तपासणी करण्यात येणार आहे . सर्वेक्षणा करिता 30 टीम कार्यरत असून 60 कर्मचारी कार्यरत आहे. पर्यावेक्षना करिता 06 पर्यवेक्षक आहेत. मिळालेल्या संशयित रुग्णांची तपासणी उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात येत आहे .
मोहीम डॉ एस व्ही तडस जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ अजय डवले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, डॉ लक्षदीप पारेकर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग वर्धा, डॉ ओमप्रकाश
गुरलवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अशी माहिती डॉ मोहन सूटे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आर्वी यांनी दिली.
तपासणी करतांना आरोग्य कर्मचारी,स्वयंसेवक,व पर्यवेक्षक प्रशांत जंगठे,
अवैद्यकिय सहाय्यक,
उपजिल्हा रुग्णालय आर्वी.जि.वर्धा.
Maharashtra News Media सच की आवाज