Breaking News

*थेट शेतातून अज्ञात चोरट्यांनी नेले 28 बोरे धान* *रामटेक तालुक्यातील प्रकार*

*थेट शेतातून अज्ञात चोरट्यांनी नेले 28 बोरे धान*

*रामटेक तालुक्यातील प्रकार*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी

रामटेक – सविस्तर माहिती अशी की,श्री.गौतम ढोके व मुकुंदा ढोके (दोघेही भाऊ) रा.भिल्लेवाडा यांची शेती खुमारी हद्दीत असून खुमारी भिल्लेवाडा या मार्गावर आहे.दोघेही शेतकरी अत्यंत गरीब घरचे असून स्वतःचा उदरनिर्वाह पुर्णतः हे शेतीवर अवलंबून आहे. व सद्द्या त्यांनी शेतजमिनीत धनाची शेती केली होती.
दि.7/12/2020 रोजी गौतम ढोके व मुकुंदा ढोके यांनी रात्री 8.00 वाजता धानाचे चुरणा करण्यासाठी मशीन बोलावून मशिनद्वारे चुरणा करण्यात आले.त्यामध्ये गौतम ढोके यांना 21 बोरे व मुकुंदा ढोके यांना 7 बोरे झाले.ते बोरे त्यांनी शेतातच ठेऊन रात्री 8.30 वाजता घरी भिल्लेवाडा येथे निघून गेले.व रात्रभर घरीच थांबून सकाळी शेतात जाऊन पाहते तर दोघांच्या पण शेतातून सम्पूर्ण धानाचे बोरे लंपास झाल्याचे दिसून आले.त्यानंतर त्यांनी इकडे-तिकडे शोध घेतला पण कुठेही धानाचे बोरे दिसून आले नाही.व विहिरीवरून देखील जलगंगा कंपनीची 2hp पाणबुळी मोटरदेखील चोरून नेल्याचे समोर आले.अशी तोंडी तक्रार गौतम ढोके व मुकुंदा ढोके यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे जाऊन दिली.सदर घटनेची माहिती मिळताच मनसर चौकी येथील पोलीस उप निरीक्षक श्री.बोरकर यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळ गाठले.व अरुण फाटे यांनी पंचनामा केला.व अज्ञात चोरांविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.यावर पोलीस उप निरीक्षक श्री.बोरकर सर यांच्याशी बोललो असता त्यांनी सदर घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सदर शेतकरी हे अत्यंत गरीब असून त्यांचं सम्पूर्ण उदरनिर्वाह हे शेतीवर अवलंबून होत.अश्या वेळी त्यांच्यावर अशी वेळ आली की,त्यांना आता काय करावं काही समजेनासं झालं.त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन धानाची शेती केलेली होती.आता त्यांच्यासमोर प्रश चिन्ह निर्माण झाला की,आता आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार.व सदर शेतकऱ्यां शासकीय मदतीची मिळावी अशी आशा त्यांच्या मनात दिसून येत आहे..याबाबतीत आमदार साहेबांना देखील आम्ही मदतीची याचना करू असे त्यांनी सांगितले आहे…

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …