Breaking News

*राष्ट्रवादी सुप्रीमो शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस उत्सवात साजरा* *खापा शहर राष्ट्रवादी व्दारे अन्नदानाचे भव्य आयोजन*

*राष्ट्रवादी सुप्रीमो शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस उत्सवात साजरा*


*खापा शहर राष्ट्रवादी व्दारे अन्नदानाचे भव्य आयोजन*

तालुका प्रतिनिधी- रवी काळबांडे*

सावनेर – सावनेर तालुक्यातील खापा शहर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला,अल्पसंख्याक, मीडिया, विधार्थी सेलच्या वतीने राष्ट्रवादी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस खापा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खापा नगर परिषदचे माजी नगर सेवक श्री अशोकजी बारापात्रे, मासुरकर गुरूजी,शंकरजी गोखे,खेमाजी डेकाटे यांच्या हस्ते केककापून, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष राजेश बावने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मकसुद शेख यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

यावेळी अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज शेख, मीडिया सेल अध्यक्ष आकाश बारापात्रे, महिला अध्यक्ष विद्याताई तुमाने, विधार्थी अध्यक्ष कपिल देशमुख, योगेश पराते, मनोज शेंडे, सचिन तुमाने, प्रवीण बावने, कुणाल नगराळे, मोरेश्वर कवडे,जाहिद शेख, चरण गजबे ईत्यादी असंख्य कार्यकर्ते व सन्माननिय नागरिक उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …