Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत रक्तदान शिबीराला ऊस्फूर्त प्रतिसाद* *८० रक्तदात्यांनी रक्तदान करुन पवार साहेंबाचा वाढदिवस साजरा*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत रक्तदान शिबीराला ऊस्फूर्त प्रतिसाद*

 

*८० रक्तदात्यांनी रक्तदान करुन पवार साहेंबाचा वाढदिवस साजरा*

 

अमरावती प्रतिनिधि – राजेन्द्र वाटणे

अंजनगांव सुर्जी – देशात सध्या रक्ताची अंत्यंत कमतरता असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आव्हानानुसार माजी केंद्रिय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक अध्यक्ष जाणता राजा शरद पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमीत्त अंजनगांव सूर्जी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराची सुरुवात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकिशोर रेखाते यांनी प्रथमक्रमांकाने रक्तदान करुन केले.
या रक्तदान शिबीराला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून दुपारपर्यंत ८१ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आयोजन असल्याचे आयोजकांनी सांगीतले.

या आरोग्य शिबाराला दर्यापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंतभाऊ वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील गावंडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष अनिल जळमकर, कांग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष प्रदिप देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिराला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काॕग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील राऊत, बाळासाहेब चऱ्हाटे, प्रशांत ठाकरे , संजय चोपडे, बाळासाहेब घोगरे, नंदकिशोर रेखाते, राजेंद्र बारब्दे, विपुल नाथे, माजी नगरसेवक कलिमभाई, फयामुदीनभाई विकास घोगरे, सुनिल कोकाटे, सागर साबळे,सागर हूरबडे, निलेश पोटदूखे, उत्कल कोकाटे, अजय फुलारी , रामकृष्ण गावंडे, रामकृष्ण बारब्दे, शुभम मेश्राम, सुमित गवळी, स्मिता लहाने, साधना कोकाटे, मीना कोल्हे, निलिमा कडू, स्मिता घोगरे, सारिका मानकर, सतिश घडेकार, सार्थक चोपडे, अजिंक्य ठाकरे, सतिश कोल्हे, विकास घोगरे, संजय सरोदे, गजानन खोरगडे यांनी प्रयत्न केले.

रा.यु.का. कडून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन..

देशाचे नेते पवार साहेब यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र तील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावे म्हणून ८०हजार युवकांना रोजगार मिळावा याकरिता तालुक्यातील युवकांना नोंदनी करता यावी याकरिता मोफत नोंदणी करण्यासाठी स्टाल उपलब्ध करण्यात आला होता.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …