Breaking News

*मंदिराच्या मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी* *भाजप चे नगर परिषद प्रशासनाला व कन्हान पोलिस प्रशासनाला निवेदन*

*मंदिराच्या मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी*

*भाजप चे नगर परिषद प्रशासनाला व कन्हान पोलिस प्रशासनाला निवेदन*

कन्हान प्रतिनिधी- ऋषभ बावनकर
कन्हान :- कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत गांधी चौक येथे असलेल्या हनुमान शिवपंचायत मंदिरा च्या मागे सार्वजनिक शौचालय बांधकामा चे प्रस्ताव विशेष सभेत पास झाले असुन भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकारी यांनी या पास झालेल्या प्रस्तावा च्या विरोध करित भाजप कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक यांचा नेतृत्वात कन्हान नप प्रशासनाला व कन्हान पोलिस प्रशासनाला निवेदन देत हनुमान मंदिराच्या मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी केली . निवेदनात म्हटले आहे की , हनुमान शिवपंचायत मंदिर 50 वर्षे पासुन कन्हान पोलिस स्टेशनला लागुन आहे . शासनाच्या आदेशानुसार हे मंदिर नोंदणीकृत असून क्रमांकही देण्यात आला आहे. या मंदिरात रामायण, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम अश्या सर्व प्रकारचे कार्यक्रम मंदिरात केले जात असुन हे मंदिर सध्या नगर परिषद च्या निशाण्यावर आले आहे. कन्हान-पिपरी नगरपरिषद च्या प्रशासनाने या हनुमान मंदिराच्या मागे 10 फूट अंतरावर जुन्या कांजीहाऊस च्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधकामाचा ठेका देत ठेकेदाराने काम सुरू करीत त्या जागेची साफ सफाई पुर्णपणे केली असुन मंदिराच्या पाठीमागे सार्वजनिक शौचालये बांधले जात आहेत . त्या ठिकाणी नगरपरिषद चे सर्व विभाग ज्या मध्ये स्वच्छता विभाग, पाणी, कार्यालय विभाग, वीज इत्यादी विभागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे इतर प्रभागात बनवले गेले सार्वजनिक शौचालयात पाण्याची व्यवस्था वास्तविक नाही व वेळेनुसार स्वच्छता नसल्यामुळे शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. यामुळे मंदिराच्या पाठीमागे सार्वजनिक शौचालय बाधल्यास त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होईल अशा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे . त्यामुळे मंदिराच्या मागे या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास तीव्र विरोध होत असुन कन्हान – पिंपरी नगरपरिषद मंदिराच्या मागे सार्वजनिक शौचालय बांधून विश्वासाचे रंग खेळत आहे . शहरातल्या धरम नगर जवळील साप्ताहिक बाजार मैदानात हे सार्वजनिक शौचालय बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता आणि या बाजारपेठेत शौचालय बांधण्यासाठी शौचालय सुविधा देखील बांधण्यात आली, . परंतु कन्हान – नगर परिषदेच्या वतीने मंदिराच्या मागे सार्वजनिक शौचालय बांधून मुद्दाम विश्वासाने गडबड करीत आहे.
भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकारी यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाला व कन्हान पोलिस प्रशासनाला निवेदन देत हनुमान मंदिरा च्या मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी केली , प्रस्ताव रद्द न केल्यास भाजप तर्फे तीव्र आंदोलन करणार अशा ईशारा पदाधिकारी यांनी एका निवेदना द्वारे दिला आहे .
निवेदन देताना भाजपा पार्शिवानी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, महामंत्री सुनील लाडेकर, रिंकेश चवरे, मयूर माटे, लीलाधर बर्वे, विनोद कोहळे, संगीत भारती, माधव वैद्य, दिनेश नानवटकर, आनंद शर्मा, शैलेश शेलेके, अमन घोडेस्वार, दिलीप गुप्ता, चंद्रगुप्त पानतावणे, अमीश रुंघे, अमोल साकोरे, सौरभ पोतभरे, राजेश पोतभरे, रोहित चकोले अजय लोंढे, अमिश रुंघे, मनोज कुरडकर सहित आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …