*मोहपा शहरात रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांच्या मागील सूत्रधार कोण?*

*महसूल विभागांचे अक्षम्य दुर्लक्ष*
मोहपा शहर प्रतिनीधी
मोहपा – शहरात बिनधास्तपणे अवैधरित्या रेतीची तस्करी सुरू आहे याकडे मात्र महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत, असून शहरात ठिकठिकाणी व जागोजागी रेतीचे ढीगच ढीग दिसत आहे . त्यामुळे या रेती माफियांना आशीर्वाद तरी कुणाचा हे सांगण्यात कठीण झाले आहे. अजूनही शासनाने कुठल्याही रेतीघाटांचा लिलाव केलेला नाही. तरीसुद्धा बिनबोभाटपणे रेतीची तस्करी मात्र सुरू आहे.महसूल विभागाच्या नाममात्र कारवाईने रेती माफिया हा निर्धास्त झालेला असून त्याला आता कुणाचेही भय वाटत नाही. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा व आजूबाजूच्या नद्या-नाल्यांना पोखरणे सुरु आहे . काही दिवसा अगोदर शहरातील अवैधपणे साठवणूक करण्यात आलेल्या रेतीवरती कारवाई करण्यात आली होती परंतु त्या रेतीची अद्यापपर्यंत विल्हेवाट लावण्यात आलेली नाही हे मात्र खरे , एकाच रॉयल्टीच्या नावावर मात्र दहा ते वीस ब्रास रेती मोहपा शहरात येत असल्याची माहिती प्राप्त आहे .
सदर रेतीचे शहरात ठिकठिकाणी रेती विक्रेत्यांनी गोळा केलेली असून महसूल प्रशासन मात्र या रेती विक्रीत्यांची साधी चौकशी सुद्धा करीत नाही त्यांच्याकडे किती ब्रासचा परवाना आहे किती ब्रास रेती आहे. परवाना आहे की नाही. याकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.८ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मात्र अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वरती कारवाई केल्याने रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे ज्यांच्याकडे रेतीचा अवैध साठा आहे त्यांची चौकशी करून त्या मालकांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ठणकावले आहेत. परंतु ती कारवाई सातत्याने होत नसल्याने रेती तस्करी करणाऱ्या माफियांनी आता धुमाकूळ घातलेला आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे कोणीच मायबाप नाही. त्यामुळे दादागिरी पद्धतीने रेतीचा अवैध व्यवसाय सुरू आहे. काही विक्रेत्यांनी मात्र कमिशनवर हजारो ब्रास रेती उतरवतात . त्याच्यामध्ये शहरातील राजकारणी जबाबदार असल्याचे नागरिक म्हणतात. रेती तस्करी करणारा रेती माफियांकरिता शहरातील नगरसेवक तहसीलदारांनी कारवाई केल्यानंतर त्यांना फोन करतात. असल्याचे सुद्धा समजते. या रेती माफियांचा मागचा मुख्य सूत्रधार महसूल प्रशासनाचा असल्याची चर्चा आहे.
महसूल विभागाच्या लक्षात या सर्व बाबी येऊन सुद्धा ते या रेती माफियांच्या चोरीला अभय देऊन झोपेचे सोंग घेत आहेत. सदर रेती विनापरवाना वाहतूक होते प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सुद्धा यामध्ये सहभाग असल्याची चर्चा आहे. कारण सदर रेती तस्कर म्हणतात की आमचे कोणीच काही बिघडू शकत नाही. हम करे सो कायदा या अविर्भावात वागत आहे. येणाऱ्या काही दिवसांत लवकरच रेती माफियांची नावे प्रकाशझोतात येईलच. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा या गंभीर प्रकाराकडे आपले लक्ष वेधावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रेती घाटाचे लिलाव झाले नसून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात रेती येते तरी कुठून याचा सुद्धा शोध प्रशासनाने लावण्याची गरज आहे . व अवैधरित्या ट्रॅक्टरने व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज