Breaking News

*दोन गुटात झालेल्या जागेच्या वाद – विवादात महिला जख्मी* *कन्हान पुलिसांनी महिलेच्या तक्रारी वरुन पुढील तपास केला सुरू*

*दोन गुटात झालेल्या जागेच्या वाद – विवादात महिला जख्मी*

*कन्हान पुलिसांनी महिलेच्या तक्रारी वरुन पुढील तपास केला सुरू*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पुलिस स्टेशन च्या हदीत गाडेघाट येथे दोन गुटात जागेचा वाद विवाद झाल्याने फिर्यादी महिलेला एका युवकांने , त्याचा आईने व बहीणी ने काळ्यांनी व कुर्हाड सारख्या घातक शस्त्राने मारहण करुन जख्मी केल्याने फिर्यादी महिला ने कन्हान पुलिस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार करुन कन्हान पुलिसांनी पुढील तपास सुरू केला .

गाडेगाट येथे शनिवार १२ डिंसेबर २०२० ला सायंकाळी ४:३० वाजता च्या सुमारास आरोपी रुपेश शिवराम टेकाम वय २८ वर्षे राहणार गाडेगाट याने फिर्यादी महिला सौ.तारा रमेश पहाड़े वय ४५ वर्षे राहणार गाडेगाट यांचा जागेवर लाखडी डेरी बांधत असता फिर्यादी महिलेच्या मुलगा आशिष ने आरोपी रुपेश टेकाम ला म्हटले कि आमच्या जागेवर लाखडी डेरी का बांधत आहे असे म्हणत शिवागाळ केली असता रुपेश ने फिर्यादी महिलेच्या मुलाला ला हात – बुक्यानी मारहण केले.थोड्यावेळानी फिर्यादी महिला घरी आल्यानंतर मुलाने आपल्या आईला माराहण केले सांगितले असता मुलाचा आई ने आरोपी रुपेश टेकाम याला म्हटले कि तु लाखडी डेरी आपल्या जागेवर बांध ऐवढेच बोलता आरोपी रुपेश टेकाम ने फिर्यादी महिले शिवगाळ करुन तुझ्या दोन्ही मुलाला पाऊन घेईन अशी धमकी दिली.

दुस~र्या दिवशी रविवार १३ डिसेंबर – २०२० ला सकाळी ८:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरच्या अंगणात भांडे घासत असतांना आरोपी रुपेश टेकाम हा आपल्या हातात कुर्हाड घेऊन आल्याने त्याने महिलेला म्हटले कि जागा आमची आहे अस म्हणत शिविगाळ केल्याने फिर्यादी महिला घरा बाहेर आली तेव्हा आरोपी रुपेश टेकाम त्याची आई मालनी टेकाम व बहीण मंदा टेकाम ह्या दोन्ही काळ्या घेऊन आल्या व शिविगाळ करीत मारहण केले .

कन्हान पुलिसांनी फिर्यादी महिला सौ तारा रमेश पहाड़े यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४४६/२०२० कलम ३२४,५०४,५०६, ३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करुन कन्हान पुलिस स्टेशन चे निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पुलिस करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …