*हेमंत सेलोकर यांची शिवशक्ती हनुमान मंदिर कमेटी च्या अध्यक्ष पदावर नियुक्ति*
*देवतळे साहेब सचिव , तर राजेश आंबेकर व रंगनाथ सोनकुसरे यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ति*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
नागपुर (कन्हान) – नागपुर च्या खरबी महामार्ग वर शक्ती माता नगर येथे असलेल्या शिवशक्ती हनुमान मंदिराची कार्यकारणी बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२० ला जाहिर झाली असुन हेमंत सेलोकर यांची शिवशक्ती हनुमान मंदिर कमेटी च्या अध्यक्ष पदावर नियुक्ति झाली . तर देवतळे साहेब सचिव , व राजेश आंबेकर आणि रंगनाथ सोनकुसरे यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ति झाल्यामुळे संताजी ब्रिगेड महाराष्ट्र महासभा जागृती मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष कविताताई रेवतकर व योगा ग्रुप च्या पदाधिकार्यांनी शिवशक्ती हनुमान मंदिर कमेटी च्या नवनियुक्ती पदाधिकार्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच संताजी ब्रिगेड महाराष्ट्र महासभा जागृती मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष कविताताई रेवतकर यांनी सर्व नवीन मतदारांना आव्हान केले कि दिनांक १ जानेवाली २०२० रोजी ज्यांचे १८ वर्ष पुर्ण होत असतील अश्या नवीन मतदारांना ६ नंबर चे फार्म भरुन आपले नाव मतदान यादीत नोंद करुन घेण्याचे आव्हान संताजी ब्रिगेड महाराष्ट्र महासभा जागृती मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष कविताताई रेवतकर यांनी केले .
कार्यक्रमात शंकर मेश्राम , विलास उट्टलवार , देवराव जनजल , शेखर इगे , कुनाल गोतमारे , स्वप्निल बिझाडे , संजय हटवार , नरेंन्द्र घाटोडे , नरेंन्द्र मेंढे यांची सुद्धा शिशशक्ती हनुमान मंदिर कमेटी च्या कार्यकारणी मध्ये विविध पदावर नियुक्ति करण्यात आली असुन समीता चकोले , राजेश आंबेकर , राजेंन्द्र चकोले आदि मोठ्या संख्येत नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज