Breaking News

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे जुनी कामठी येथे उद्घाटन*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे जुनी कामठी येथे उद्घाटन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरा पासुन ९ किलो मीटर अंतरावर असलेल्या जुनी कामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन व मनसे गाव शाखा फलका चे अनावरण करून उद्घाटन सोहळा थटात संपन्न झाला.

जुनिकामठी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते आणि पारशिवनी तालुक्याचे अध्यक्ष रोशन फुलझेले यांचा पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे जुनी कामठी येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर जिल्हा सचिव मनोज गुप्ता, नागपूर शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पांडे, विक्की नांदूरकर, रामभाऊ,बावणे, दत्ता साकुलकर, निखिल झाडे, हाफिज अन्सारी, शैलेश गुप्ता, सागर गायकवाड आदी च्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुनी कामठी शाखा अध्यक्ष म्हणुन उकुंडराव देवगडे यांची नियुक्ती करण्यात आली. गावाच्या प्रवेश व्दारा जवळ मनसे शाखा जुनी कामठी फलका चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला . कार्यक्रमाच्या यशस्विते करिता उकुंडराव देवगडे, राम जुनघरे, मंगेश कावळे, योगराज उके सहित आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …