Breaking News

*हनुमान मंदिराच्या मागे शौचालय न बांधण्याची मागणी* *बजरंग दल च्या पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाला व कन्हान पुलिस प्रशासनाला दिले निवेदन*

*हनुमान मंदिराच्या मागे शौचालय न बांधण्याची मागणी*

*बजरंग दल च्या पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासनाला व कन्हान पुलिस प्रशासनाला दिले निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हदीत गांधी चौक येथे शिवपंचायत मंदीराचा मागे सार्वजनिक शौचालय निर्माण करण्याचे प्रस्ताव नगर परिषद प्रशासनाने मागच्या गेल्या काही दिवसा पुर्वी झालेल्या विषेश सभा च्या बैठकीत पास केले असुन या प्रस्तावा चा विरोध करत बजरंग दल च्या पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पुलिस स्टेशन चे एपीआई अमित कुमार आतराम यांना एक निवेदन देऊन हनुमान मंदिराचा मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी केली आहे .

निवेदनात सांगितले आहे कि शिवपंचायत हनुमान मंदीर हे ५० वर्षापासुन कन्हान पुलिस स्टेशन ला लागुन असुन या मंदिरात रामायण , सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत असुन मंदिराच्या बाजुला विविध प्रकारचे दुकाने आहे . त्यामुळे मंदिराचा मागे १० फुट अंतरावर असलेल्या कांजीहाऊस च्या जागेवर सार्वजनिक शौचालय बांधल्यास परिसरात गंदगी चे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंध पसरल्याने दुकानदारांना व नागरिकांना विविध प्रकारच्या बीमार्या होईल .

अशी आशा व्यक्त करित बजरंग दल च्या पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पुलिस स्टेशन चे एपीआई अमित कुमार आतराम यांना एक निवेदन देऊन हनुमान मंदिराचा मागे सार्वजनिक शौचालय न बांधण्याची मागणी केली .

निवेदनात पारशिवनी तहसील चे संयोजक विलास यादव , शुभम यादव , गोलु यादव , सनोज पनिकर , विनोद किरपान , हर्ष पाटील , विलास घारपिंडे , टेमराज भरणे , संन्तया वंजारी , गोपाल मसार , लक्ष्मण राजे , मनोज कलचुरी , रवि वानखेड़े , सचिन घोडमारे , किरण ठाकुर , नोहर देवांघण , विजय पारधी , महेंन्द्र साबरे , संदीप कभे , पवन राऊत , श्रवन वतेकर , सहित अनेक बजरंग दल चे कार्यकर्ता उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …