*माधवबाग कोंढाळी हॉस्पिटल येथे 2D ECO सुविधा उपलब्ध !!*

*संपूर्ण ग्राम हृदयरोग मुक्त अभियानांतर्गत माधवबाग कोंढाळी येथे काटोल तालुक्यातील ग्रामीण रुग्णसेवेसाठी आधुनिक 2D ECO मशीन सुविधेचा शुभारंभ*
विशेष प्रतिनिधि
नागपूर – पासून 50किलोमीटर अंतरावर कोंढाळी स्थित माधवबाग हॉस्पिटल भारतातील एक नॉन-सर्जिकल आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. हृदयविकारासंबंधीत आजारांचा सामना करत असलेल्या रुग्णांना फक्त सहा दिवसात कोणत्याही ऑपरेशन शिवाय हृदयविकारापासून मुक्त करण्याचे कार्य या हॉस्पिटल मध्ये केले जाते. डॉक्टरांमार्फत अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीचा सल्ला मिळालेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल ‘संजीवनीच’ बनलेलं आहे. माधवबाग कोंढाळी हॉस्पिटल हे शहरापासून दूर प्रदूषणरहित नागपूरच्या कोंढाळी येथे 7 एकर जमिनीच्या निसर्गरम्य भागात स्थित आहे. या हॉस्पिटलमध्ये आईपीडी/ओपीडी, 24 तास वैद्यकीय सुविधा, फिजियोथेरपी, कार्डिएक एक्सरसाइज रूम, पॅथलॅब, कार्डिएक एम्ब्युलेन्स,पंचकर्म रूम, आयसीयु, इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. अशा सर्व सुविधांप्रमाणे हृदयविकारासंबंधित 2D ECO + जी. एल. एस अशी अत्याधुनिक तपासणी उपलब्ध करण्यात येणार आहे. जी. एल. एस. म्हणजेच एक असा स्कोर ज्या स्कोरच्या माध्यमातून हृदयाच्या मांसपेशींचा रक्तपुरवठा आपल्याला सहज जाणून घेता येऊ शकतो. अशा प्रकारची तपासणी आता माधवबागच्या कोंढाळी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
2डी इको म्हणजे काय ?
हृदयविकाराची निश्चिती करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात, त्यांच्या यंत्रांमध्ये आणि तंत्रांमध्ये खूपच प्रगती झालेली आहे. त्याचा रुग्णांना फायदा होऊन लवकरात लवकर हृदय विकाराचे निदान करता येते. अशा तपासण्यांपैकी एक तपासणी म्हणजे 2डी इकोची तपासणी होय जी आता जी. एल. एस कोडींग असलेली अत्याधुनिक अशी वैशिष्यपूर्ण चाचणी आहे. या तपासणीमध्ये रुग्णाच्या छातीवर विशिष्ट प्रकारचे जेल लावूनडॉपलर अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने हृदयाची कार्यक्षमता, हृदयाचे आकुंचन-प्रसरण पावणे, रक्तप्रवाहाचा वेग इत्यादी गोष्टींचे आकलन चलचित्राद्वारे तज्ज्ञांना करता येते त्याच प्रमाणे जी. एल. एस कोडींगच्या साहाय्याने हृदयातील मांसपेशींचा रक्तपुरवठा आपल्याला जाणून घेता येऊ शकतो. ज्याच्या साहाय्याने तज्ज्ञ रुग्णांच्या हृदयाची कार्यक्षमता निश्चित करता येते. अशीच सुविधा माधवबाग कोंढाळी हॉस्पिटलयेथे रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हा शुभारंभ सोहळा रविवार, दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता. माधवबाग कोंढाळी हॉस्पिटल येथे
मा. डॉ अशोकजी जैस्वाल ( सहसचिव, निमा असोसिएशन केंद्रीय शाखा दिल्ली ), मा. डॉ. नानाजी पोंजगे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र निमा, नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन), मा . डॉ प्रदीप पाटिल (महाराष्ट्र निमा (नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन) शाखा, हिंगना ) .
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. डॉ. बी.पी. टावरी ( अध्यक्ष महाराष्ट्र निमा,नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन, शाखा कोंढाळी ). प्रमुख उपस्थिती : मा. डॉ. अश्विन सुळे ( अध्यक्ष -वाडी आयुष्य मेडिकल असोसिएशन वाडी ), मा. डॉ. आर. एस. पठान ( कोषाध्यक्ष महाराष्ट्र निमा नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन शाखा कोंढाळी ), मा. डॉ. जयंत बापट ( सचिव,महाराष्ट्र निमा,नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन शाखा कोंढाळी ), मा. डॉ. संजय ढोकने (अध्यक्ष महाराष्ट्र निमा,नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन शाखा जलालखेडा ), मा. डॉ . रोशनजी निनावे ( अध्यक्ष महाराष्ट्र निमा,नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन शाखा सावनेर), मा. डॉ. ओमप्रकाशजी बरडे ( अध्यक्ष महाराष्ट्र निमा,नॅशनल इंटींग्रेटेड मेडिकल अशोसिएशन ). या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माधवबागचे मा. श्रीपाद उपासानी ( सी. ओ. ओ, माधवबाग मुंबई ) आणि मा. श्री. योगेश वालावलकर ( स्ट्रेटिजिक हेड, माधवबाग मुंबई ) यांची उपस्थिती असणार आहे .
तसेच या शुभारंभ कार्यक्रमानंतर ऑरेंज शिवाना फार्महाऊस, कोंढाळी ते काटोल रोड तालुक्यातील ग्रामीण रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक 2D ECO मशीनचे महत्व या विषयी माधवबागचे मुबंई येथील मा. डॉ दिनेश पाटिल ( हृदयरोग तज्ज्ञ, मुंबई ) आणि मा. डॉ. गुरुदत्त अमीन ( चीफ मेडिकल ऑफिसर, माधवबाग, मुबंई ) हे मार्गदर्शन करणार आहेत.
माधवबाग कोंढाळी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरपासून कोंढाळी पर्यंत 50 किलोमीटरच्या अंतरावर कुठे ही 2डी इकोची सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळेच कोंढाळी हॉस्पिटल उपलब्ध करून देत असलेल्या या तपासणीचा काटोल, सावनेर , नरखेड, कारंजा, तळेगाव, आर्वी, कोंढाळी या आणि अशा अनेक गावांतील सर्व ग्रामस्थांना लाभ होणार आहे.
Maharashtra News Media सच की आवाज