Breaking News

*रामकृष्ण मठ च्या वतीने आदर्श हायस्कुल च्या गरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण*

*रामकृष्ण मठ च्या वतीने आदर्श हायस्कुल च्या गरिब विद्यार्थ्यांना ब्लॉकिंट वितरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना द्वारे लागु केले नियमाचे पालन करुन आदर्श हायस्कुल कन्हान येथे शिक्षण घेत असलेल्या गरिब विद्यार्थ्यांना थंडी पासुन बचाव करण्याकरिता ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले.

शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर ला कन्हान च्या आदर्श हायस्कुल सुरेश नगर येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर च्या वतीने सोशल डिंस्टसिंग नियमाचे पालन करुन शाळेतील ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरिब विद्यार्थ्यांना थंडी पासुन बचाव करण्याकरिता मठाचे स्वामी तनिष्ठा नंद महाराज व त्याच्या सहकार्यांच्या हस्ते ब्लॉकिंट चे वितरण करण्यात आले. यावेळी वितरण कार्यक्रमात उपस्थित सर्वांना कोरोना आजारावर विजय मिळविण्या करिता सामाजिक अंतर पाळा, मॉस्क चा वापर नेहमी करा, गर्दी टाळा असे आव्हान करण्यात आले. याप्रसंगी आयडियल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भरत सावळे , मुख्याध्यापिका एस एस मसालकर , शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम एस डोंगरे यांनी केले तर आभार सी एन मेश्राम हयांनी मानले .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …