*कन्हान शहर येथे संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथि केली साजरी*
*विविध संघटनांनी केले कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर येथे संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथि निमित्य विविध संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .

*हिराबाई शाळा कन्हान*
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे शाळेच्या प्रागंणात संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन शाळेचे संचालक नरेंन्द्रजी वाघमारे यांचा हस्ते संत गाडगेबाबा प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी प्रमुख अतिथी ओमप्रकाश काकडे ,प्रशांत बाजीराव मसार, रेखा टोहणे यांनी संत गाडगेबाबाचां जिवनावर मार्गदर्शन करीत स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन दिलीपजी सायरे यानी केले . व अभार हिराबाई शाळा वसतिगृह अधिक्षक गणेश रामापुरे यांनी मानले . कार्यक्रमात चंदन मेश्राम, अमोल साकोरे, प्रदीप बावणे, दिपक तिवाडे, पकंज गजभिये, निलेश सायरे आदी उपस्थित होते.

*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान शहर विकास मंच च्या वतीने संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन सर्व मंच पदाधिकारी यांनी संत गाडगे यांचा प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले।
रविवार दिनांक २० डिसेंबर संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतिथि निमित्य कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन मंच महिला सदस्य सुषमा मस्के यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी संत गाडगे बाबा यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . यावेळी सर्व मंच पदाधिकारी यांनी संत गाडगे बाबा यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , कल्याणी सरोदे , मुकेश गंगराज , अक्षय फूले सहित आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज