*मोहपा शहरातील जीर्ण पुलाचा मुहूर्त कधी*
*निधी उपलब्ध असताना न . प उदासीनता*
*कामाचा कालावधी संपला परंतु मुहूर्त झालाच नाही*
विशेष प्रतिनिधि – राहुल आंजनकर
मोहपा – शहरातील मधूगंगा नदीवरील जीर्ण पुलाच्या नवीन बांधकामासाठी गत तीन वर्षांपासून पालिकडे निधी उपलब्ध आहेत . सदर पुलाच्या कंत्राटदाराला ११ सप्टेंबरला बांधकामाचा कार्यदेश देण्यात आला. परंतु जुन्या पुलालगतच्या पाणीपुरवठ्याचे पाईप आणि विजेचे खांब स्थलांतरित करण्यात पालिकेकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे या पुलाचे बांधकाम अद्यापही सुरू झालेले नाही. परिणामी या पुलावरून वाहतूक सुरू असून अपघाताचा धोका वाढला आहे.
दि.२६ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक २२ कंत्राटदार श्याम सिंग देवीसिंग ठाकूर यांना सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एकूण पाच वेगवेगळ्या योजनांची विकासकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी करारनाम्यातील मुदतीच्या आत एकही विकास काम पूर्ण केलेले नाही. काही कामांना दोन महिन्याची मुदत दिली असता, दहा ते बारा महिने तर चार महिन्याच्या मुदतीतील कामांना दहा ते बारा महिने पूर्ण करण्यास लावले. तसेच या एकाच आर्थिक वर्षात एकाच कंत्राटदाराला पाच वेगवेगळी कामे देण्यात आली मधुगंगानदीच्या पुलाचे बांधकाम जर याच कंत्राटदाराला देण्याचे प्रशासनाने मान्य केले. तर एकूण सहा कामे होईल शासनाच्या सार्वजनिक बांधकामच्या नियमाप्रमाणे एका वर्षात आर्थिक एका कंत्राटदाराला तीनपेक्षा जास्त विकास कामांचे आदेश देऊ नये. यापुढे श्यामसिंग देवी सिंग ठाकूर यांना मधूनगंगा नदीच्या पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश न देता फिर निधीची कार्यवाही करावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.
परंतु नगरपालिकेने पुन्हा दि.२४ जुलै रोजी स्थायी समिती ठराव क्रमांक १९ शासनाच्या सार्वजनिक बांधकामच्या नियमाप्रमाणे एका वर्षात आर्थिक एका कंत्राटदाराला तीनपेक्षा जास्त विकास कामांचे आदेश देऊ नये हे रद्द झाल्यामुळे , व कामाचे अंदाजपत्रक हे जुने असल्यामुळे कदाचित दुसरा कंत्राटदार काम करणार नाही.किंवा अंदाजपत्रकाला नव्याने तांत्रीक मंजूर घेतल्यास कामाची किंमत वाढण्याची शक्यता असून नगरपरिषदेला वाढीव निधी उपलब्ध करून देता येणार नाही.तसेच सदर पुलाची तांत्रिक परिस्थिती अत्यंत खराब असून त्यावरील वाहतूक तात्काळ नाईलाजाने कोणत्याही वेळी बंद करावी लागेल त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे सर्व सदस्यांचा आग्रह असल्याने श्याम सिंग ठाकूर अँड कंट्रक्शन काटोल यांना सदरहून कामाचे आदेश अंदाजपत्रकीय दरापेक्षा ३.६६ टक्के कमी दराने देण्यात येऊन मुदतीच्या आत त्यांच्याकडून बांधकाम करून घ्यावेत व याला कार्यात्तर मंजुरीकरिता सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात यावे. असा ठराव स्थायी समितीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.
पुलाच्या बांधकामाची किंमत ९९ लक्ष असून पुलाचे बांधकाम हे दोन महिन्यांत पूर्ण करण्यात न आल्यामुळे कंत्राटदाराने २०१८_१९ मध्ये केलेल्या कामांचा परत प्रत्यय दिलेला आहे.अजून पर्यंत पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नसल्यामुळे अजून पुलाच्या मुहूर्ताला किती दिवस लागतील असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.कंत्राटदाराला येथील प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे कंत्राटदार नागरिकांना वेठीस धरून त्रास देत असल्याची चर्चा मोहपा शहरात जोर धरत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज