Breaking News

*पत्रकार सूरज पाटील यांचे निधन*

*पत्रकार सूरज पाटील यांचे निधन*

नागपूर :- वरिष्ठ पत्रकार सूरज मोतीराम पाटील यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३०वाजता विहिरगाव येथे अन्त्यसंस्कार होणार आहे.

पत्रकार सूरज पाटील यांनी दैनिक तरुण भारतातून पत्रकारितेचे धडे गिरविले होते. त्यानंतर देशोन्नती, लोकशाही वार्ता असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास राहिला. आनंद या स्वयंसेवी संस्थेमार्फत ते वर्षभर विविध उपक्रम राबवीत असत. या संस्थेला त्यांनी अनेक पुरस्कार मिळवून दिले. ते सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी काही वर्षे शिवसैनिक म्हणून काम केले. गेल्या दीड वर्षापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. दर आठवड्यात त्यांना डायलिसिस करावी लागत असे. शंकर नगर चौक नागपूर स्थित चौबे हॉस्टिपल येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. परंतु, डायलिसिस करून प्रकृतीत सुधारणा झाली नाही. श्वासोच्छ्श्वासाचा त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही सूरज पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ते अखेरच्या घटका मोजत असल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढून त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. रस्त्यांतच पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली, तर पत्रकारसृष्टीत शोककळा पसरली.

*नागपूर ( ग्रामीण ) तालुका पत्रकार संघ कडून भावपुर्ण श्रद्धांजली*🌹💐

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …