Breaking News

*खापरखेडा येथे क्रिकेट ॲकेडमीची स्थापना* *भारतीय दिव्यांग संघाचे कर्णधार गुरुदास राऊत यांची प्रमुख उपस्थिती*

*खापरखेडा येथे क्रिकेट ॲकेडमीची स्थापना*


*भारतीय दिव्यांग संघाचे कर्णधार गुरुदास राऊत यांची प्रमुख उपस्थिती*

विशेष प्रतिनिधी – रवी काळबांडे

सावनेर – तालुक्यातील खापरखेडा येथे ग्रामीण युवकांमध्ये नवचैतन्य, शारीरिक विकास तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी खापरखेडा येथे के.पी.के.डी. क्रिकेट ॲकेडेमीची स्थापना करण्यात आली असून या ॲकेडमीचे उद्घाटन भारतीय दिव्यांग संघाचा कर्णधार गुरुदास राऊत यांच्या हस्ते खापरखेडा येथील मिलन चौकातील उमेश यादव यांच्या निवासस्थानाजवळ नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय संघा मध्ये विदर्भ एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज व खापरखेडा निवासी उमेश यादव यांचे वडील तिलक यादव हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त पियूष आंबुलकर, खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण राठोड, अनिल कोटांगळे, कृष्णा गिऱ्हे, दिव्या नाईक, विशाल नाईक आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी भारतीय दिव्यांग संघाचा कर्णधार गुरुदास राऊत यांचा ॲकेडमी तर्फे शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केपिकेडी क्रिकेट अकॅडमीचे ईश्वर ठाकरे, भूषण गिऱ्हे,आकांशा ठाकरे,उत्कर्ष ठाकरे, प्रियंका गिऱ्हे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …