*”काळाबाजारी भोवली “*
*नांदा येथील रास्तभाव दुकान कायमचे रद्द*
*संधीचा गैरफायदा घेत सातत्याने केली लुट*
*बचत गटाला दुकान देण्याची मागणी*
कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे
कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा येथील रास्तभाव दुकानदाराकडून मागील ६ वर्षापासून सातत्याने शिधापत्रिकाधारकांची लुट करुन काळाबाजारी केली जात होती २०१५ व २०१७ मध्ये दोनदा रास्तभाव दुकान रद्द करण्यात आले होते जिल्हा पुरवठा विभागानेही दंड वसुल करुन अनेकदा संधी दिली , मात्र काळाबाजारी करणे बंद न केल्याने नांदा येथील रास्तभाव दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेन्द्र दांडेकर यांनी कायम स्वरुपी रद्द करुन दणका दिल्याने आता किसन गोंडे यांच्या काळाबाजारीला कायमचीच लगाम लागणार आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये अन्नसुरक्षा कायदा अमलात आला शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्याऐवजी नांदा व नांदाफाटा येथील रास्तभाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांची मोठी आर्थिक लुट केली २०१५ मध्ये चौकशी अंती येथील रास्तभाव दुकाने जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी रद्द केली होती रास्तभाव दुकानदारने विभागीय आयुक्तांकडे अपील करुन उपजीविके करिता रास्तभाव दुकाना शिवाय इतर व्यवसाय नसल्याने पुन्हा चुका करणार नसल्याचे हमीपत्र लिहून दिल्याने शासनाने परत रास्तभाव दुकान बहाल केले संधीचा सदुपयोग करण्याऐवजी सातत्याने लुट सुरुच ठेवली . जिल्हा पुरवठा विभागाने आर्थिक दंड लावूनही सुधारणा होत नसल्याने २०१७ मध्ये किसन गोंडे यांचा परवाना रद्द केला आयुक्तांनीही परत संधी नाकारली राजकिय वजन वापरुन मंत्रालयातून दुकान बहाल करुन घेण्यास गोंडे यशस्वी झाले परत लुट न करण्याची हमी , तरीही लुट सुरु , परत दंड आकारला. तरीही सुधारणा नाही , लुट सुरुच ठेवली
अपंग व्यक्तीला धान्य न देणे मुलगा व सुन दोघेही जिल्हापरीषद शिक्षक असतांना त्यांचे नावाने धान्य उचलणे आगाऊचे पैसे घेणे काळाबाजारी करणे किसन गोंडे यांनी सुरुच ठेवल्याने उशीरा का होईना जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी नांदा येथील रास्तभाव दुकान रद्द करुन किसन गोंडे यांना चांगलाच दणका दिला आहे राजकिय वजनाचा वापर करुन काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना हाताशी धरुन दुकान परत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत नांदा येथील रास्तभाव दुकान महिला बचत गटाला देऊन काळाबाजारी करणार्याची मक्तेदारी कायमची संपविण्याची मागणी महिलांनी केली आहे
Maharashtra News Media सच की आवाज