Breaking News

*आमडी हिवरी शिवारात श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आले*

*आमडी हिवरी शिवारात श्रमदानातुन वनराई बंधारा बांधण्यात आले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – मौजा हिवरी (हिवरा) ग्राम पंचायत आमडी शिवारात च्या नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी. गच्चे यांचा मार्गदर्शनात तसेच मंडळ कृषी अधिकारी कन्हान जी.बी. वाघ यांचा प्रयत्नाने हिवरी (हिवरा) येथील शेतकरी व नागरिकांच्या मदतीने श्रमदानातुन गाव शिवारा तील जिवंत नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आले.
या बंधारा बांधाल्यामुळे पावसाळ्यानंतर नाल्यातुन वाहुन जाणारे पाणी पारंपारिक पद्धतीने अडवून ते पाणी जमिनीत जिरविण्यासाठी मदत होईल. वनराई बंधा-यात साठलेल्या पाण्यामुळे आसपासच्या शिवारातील भुजल पातळी वाढून तलाव, विहिरीत जल पातळी वाढण्यास मदत होईल, आणि सदर नाल्यालागत असलेल्या शेतकऱ्यांना पर्यायी सिंचनाची व्यवस्था होईल. या सार्थ हेतुने बंधाऱा बांधण्यात आले.


यावेळी आमडी ग्रामपंचायत सरपंचा सौ.शुभांगी ताई भोस्कर, शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख श्री. राजु भाऊ भोस्कर, मंडळ कृषी अधिकारी जी.बी. वाघ , माजी सरपंच श्री. जिवलग चव्हाण, कृषी पर्यवेक्षक कु. संपकाळ मॅडम, कृषी सहाय्यक कु. राठोड, कु. ढंगारे, श्री. ठोंबरे, कृषी मित्र श्री झाडे भाऊ, रोजगार सेवक सत्यशील चव्हाण व गावकरी रत्नमाला ढोके , रुक्माबाई दहाडे, मंदाबाई चव्हाण, शिल्पाबाई चव्हाण, शालु केळकर, रत्नमाला चव्हाण, यशोदाबाई घोडमारे, रोशन नवधिंगे, प्रतिक बारई, अभिषेक वाघमारे, रजत वासे आदीसह गावातील शेतक-यांच्या सहकार्याने श्रमदान करून वनराई बंधारा बांधण्यात आले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …