*केरडी येथे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी आधुनिक किर्तनाच्या कार्यक्रमात थटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – केरडी येथे ग्रामस्था च्या वतीने आधुनिक भागवत सप्ताह, गावात स्वच्छता, दिंडी पालखी व दहीकाला कार्यक्रम व सात दिवस आधुनिक किर्तनाने समाज प्रबोधन करित संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी थटात साजरी करण्यात आली.

केरडी येथे जगतगुरू संत तुकाराम व संत तुकडोजी महाराज मंदिरात संत गाडगे बाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्य दि.१४ ते २० डिसेंबर २०२० पर्यंत भागवत सप्ताह आचार्य चंद्रभानजी बिहुणे रा. मेहंदी, किसन सपाटे रा.रोहा तुमसर, अशोक बुधे रा. ढोळवा डा, विजय श्रिरसागर, अमृत हिवराळे रा दहेगाव यांचा संस्थेने गाव स्वच्छता, अंधश्रध्दा, बुवाबाजी, हुंडा बळी, वाईट प्रथा, शिक्षणाचे फायदे आदि ज्वलंत विषयावर आपल्या आधुनिक किर्तनातुन मार्मिक प्रबोधन केले. शनिवार ला गावात स्वच्छता, रविवार दिनांक.२० ला सकाळी पालखी दिंडी यात्रा काढुन संपुर्ण गाव भ्रमण करून मंदीरात दुपारी १२ वाजता गोपाल काल्याच्या किर्तनाने दहीहंडी फोडुन दहीकाला व महाप्रसाद वितरण करुन संत गाडगे बाबा यांची जयंती थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता संत तुकाराम व संत तुकडोजी महाराज मंदिर कमेटी, केरडी ग्रामपंचायत सरपंचा सौ रत्नमाला वानखेडे सहित गावाच्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज