Breaking News

*शासकीय सुटीच्या दिवशी जात पडताळणी कार्यालय नेहमी सुरू राहणार*

*शासकीय सुटीच्या दिवशी जात पडताळणी कार्यालय नेहमी सुरू राहणार*

विशेष प्रतिनिधी खापरखेडा
नागपुर – सन 2020-21 मध्ये राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याचे पोचपावती जोडणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी नागपूर जिल्ह्यामध्ये 130 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. अर्जदाराने बार्बीटच्या वेबसाईटवर जात प्रमाणपत्र पडताळणी करिता ऑनलाईन अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यामार्फत या कार्यालयामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे. समिती कार्यालय मध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीत उभे राहू इच्छिणार्‍या उमेदवाराकडून जात पडताळणीचे अर्ज दाखल होतात. त्यामुळे उमेदवारांची वेळेवर गैरसोय होऊ नये म्हणून दिनांक 25, 26 व 27 डिसेंबर रोजी या शासकीय सुटीच्या दिवशी सुद्धा जातपडताळणी कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे करिता नियमित सुरू राहील याची निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांची नोंद घ्यावी व आपले अर्ज कार्यालयामध्ये दाखल करावे असे जाहीर आव्हान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …