Breaking News

*पिंपळगाव (वखाजी) येथील तरुण शेतक-याची कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या*

*पिंपळगाव (वखाजी) येथील तरुण शेतक-याची कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – कर्जबाजारी होऊन एका तरुण शेतक-याने स्वताच्याच शेतात विषारी किटकनाशक पिउन आत्महत्या केल्याची घटना पुलिस स्टेशन नरखेड हद्दीतील पिंपळगाव (वखाजी) शिवारात आज दि. २४/१२/२०२० रोज गुरुवार ला सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली.


आत्महत्या केलेल्या शेतकरी तरुनाचे नाव अजय भाऊराव ठाकरे वय वर्ष ४० राहणार पिंपळगाव (वखाजी) असे असून तो २ दिवस पासून बेपत्ता होता .आज सकाळी 7 च्या सुमारास शेजारच्या शेतकऱ्याचा मृतदेह शेतात पडून आसल्याचे आढळुन आले. गावकरी आणि नातेवाहिकांनी सांगितल्या प्रमाणे मृतक शेतकारी कर्जापाई कंटाळलेला होता. त्याच्या वर 5 लाखाचे बँकेचे कर्ज होते याच वैतागात त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे . त्याच्या मागे आई पत्नी तसेच २ मुल असा व्याप्त परिवार आहे.
प्रथम दर्शनी ही आत्महत्त्याच असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच मृतका पासून विषारी किटकनाशकाचा डब्बा तसेच मोबाइल आढळुन आल्याची माहिती पोलिसांन्नी दिली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय नरखेड येथे शव विचेदनासाठी पाठविला असून पुढील तपास पुलिस करीत आहेत .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …