Breaking News

*अरबाज खान या ईसमावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी* *कन्हान शहर युवक कांग्रेस चे कन्हान पोलीस स्टेशन च्या निरीक्षकांना निवेदन*

*अरबाज खान या ईसमावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी*

 

*कन्हान शहर युवक कांग्रेस चे कन्हान पोलीस स्टेशन च्या निरीक्षकांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर जिल्ह्याचा काटोल रोड येथील रहिवासी अरबाज खान या ईसमाने हिंदु समाजा विरुद्ध एक व्हिडियो सोशल मीडिया वर वायरल करुन हिंदु समाजा लोकांना ठेस पहुचवण्याचे कार्य केल्याने जागो जागी या घटनेचे जाहिर निषेध सुरु असुन कन्हान शहर युवक कांग्रेस च्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष राजा यादव यांचा नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक निवेदन देऊन अरबाज खान या ईसमावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .

निवेदनात सांगितले आहे कि अरबाज खान या ईसमाने हिंदु – मुस्लिम समाजाचा मधात खोट्या भावना निर्माण करण्याचा उद्देशाने हिंदु समाजा विरुद्ध व हिंदु महिलांना शिविगाळ करित असलेला एक व्हिडियो सोशल मीडिया वर वायरल केल्याने हिंदु धर्माचा अपमान केला असुन हिंदु समाजात व मुस्लिम समाजात दरार निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने कन्हान शहर युवक कांग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अरबाज खान या ईसमावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली .

निवेदनात कन्हान शहर युवक कांग्रेस अध्यक्ष राजा यादव , नगरसेविका रेखा टोहणे , आकिब सिद्धिकी , प्रशांत मसार , प्रदीप बावने , अजय कापसीकर , अमोल प्रसाद , पुरुषोत्तम शेंदरे , गणेश भालेकर , चंदन मेश्राम , शुभम यादव , पंकज गजभिए , मेघराज लुंढेरे सहित अनेक कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …