Breaking News

*नयाकुंड शिवारात बोलेरो जिप ने विरुद्ध दिशेने येणारी एक्टीवा ला समोरून टक्कर ने एक मृत,तिन घायल*

*नयाकुंड शिवारात बोलेरो जिप ने विरुद्ध दिशेने येणारी एक्टीवा ला समोरून टक्कर ने एक मृत,तिन घायल*


पारशिवनी तालुका प्रातिनिधी – कमलसिंह यादव

 

पारशिवनी – पोलिस स्टेशन च्या हद्दीत रामटेक-पारशिवनी महामार्ग स्थित नयाकुडं शिवारात
दि. २६ डिसेंबर चे रात्रि ७:३० वा. दरम्यान दुचाकी चालाक मृतक नामे मंगेश यादवराव गावंडे वय 30वर्ष रा. गोदनी ,नागपूर हा आपले ऍक्टिवा मोपेड क्र. MH 40/BR 459 ने रामटेक येथून पारशिवनी मार्गे नागपूर येथे जात असताना मौजा नयाकुंड शिवारात आमडी ते पारशिवानी रोड वर विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो सवारी गाडी क्र. MH 36/5421 चे चालकाने गाडी भरधावं वेगाने व निष्काळजी पणे चालवून मृतकचे ऍक्टिवाला जोरदार धडक दिली ,त्यामुळे ऍक्टिव्हा चालक मंगेश यादवराव गावंडे यास डोक्याला जबर मार लागून उपचारा दरम्यान त्याचा उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे मृत्यू झाला. तसेंच बोलेरो गाडीमद्ये बसलेल्या 15-16 प्रवाशा पैकी 3 महिला प्रवाशी हे जखमी झाले. सदर प्रकरणी पोलिस स्टेशन पारशिवानी येथे अप. क्र. 324/20 कलम 304(अ ), 279,337,338 IPC अन्वये गुन्हा नोंद आहे. आरोपी बोलेरो गाडी चालक नामें भगतसिंग भगवान भुजाडे रा. नागळवाडी ता. सावनेर हा घटना तारखेपासून फरार असून त्याचा शोध सुरु आहे.पुढील तपास पारा शिवनी पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शानात पो.उपनिरिक्षक संदिपान उबाळे सह पो.ना.मुद्दस्सर जमाल,संदिप कङु,अमोल मेंघरे, रोशन काळे,अमित यादव ,शुभम गायकवाड,अन्य पुढील तपास करित आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …