Breaking News

*कन्हान शहरात क्रिसमस दिवस थटात संपन्न* *विविध सामाजिक संघटनांनी चर्च येथे भेट देऊन ईसाई सामाजाचा लोकांना क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या*

*कन्हान शहरात क्रिसमस दिवस थटात संपन्न*

*विविध सामाजिक संघटनांनी चर्च येथे भेट देऊन ईसाई सामाजाचा लोकांना क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कोरोना च्या प्रार्दुभाव लक्षात घेत कन्हान शहरातल्या चर्च मध्ये ईसाई सामाजाचा लोकांनी सोशल डिस्टेसिंग , मास्क , सेनिटाइजर , चा वापर करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला .
कन्हान शहरात क्रिसमस दिवस वर विविध चर्च मध्ये व ईसाई सामाजाचा लोकांनी आपल्या घरात येशु मसीह च्या वाढदिवस आयोजित करुन गुरुवार २५ डिसेंबर ला रात्री १२ वाजता येशु मसीह च्या वाढदिवस साजरा करण्यात आला असुन शुक्रवार ला गणेश नगर येथे विश्व ज्योति चर्च , व पिपरी मार्ग वर असलेल्या बेतेल चर्च मध्ये क्रिसमस दिवस वर कार्यक्रम आयोजित करुन येशु मसीह यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुजा पाठ करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला असुन शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध चर्च येथे भेट देऊन फादर व ईसाई सामाजाचा लोकांना पुष्प गुच्छ देऊन क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या

यावेळी राजेंन्द्र फुलझले , रोहित मानवटकर , राॅबिन निकोसे , चेतन मेश्राम , गणेश भालेकर , सतीश बेलसरे , अजय चव्हान , अखिलेश मेश्राम , राहुल हातागडे , सावन शेंडे , शेषराव लोंढे , सीताबाई भालेकर , अजय पात्रे , सोना गायकवाड़ , उमेश लोंढे , लाॅरेंन्स अॅंथोनी सहित अनेक कार्यकर्ता उपस्थित होते .
तसेच कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी पिपरी मार्ग येथे असलेल्या बेतेल चर्च मध्ये भेट देऊन ईसाई सामाजाचा लोकांना पुष्प गुच्छ देऊन क्रिसमस च्या शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , हरीओम प्रकाश नारायण , सुषमा मस्के , वैशाली खंडार सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …