Breaking News

*पेंच व्याघ्र प्रकल्पात रक्तदान शिबिराचे आयोजन* * 47 रक्तदात्यांनी केले रक्तदान* *रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*पेंच व्याघ्र प्रकल्पात रक्तदान शिबिराचे आयोजन*


* 47 रक्तदात्यांनी केले रक्तदान*


*रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

देवलापार प्रतिनिधी-पुरुषोत्तम डडमल

देवलापार – राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वाना रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. सध्या राज्याची रक्ताची गरज पाहता रक्तदान करून या संकट प्रसंगी आपला खारीचा वाटा उचलणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून काल शनिवार 26 डिसेंबर 2020 रोजी पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांच्या वतीने अमलतास निसर्ग निर्वाचन केंद्र, सिल्लारी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात 47 वन अधिकारी- कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन परिक्षेत्रातील वन अधिकारी-कर्मचारी यांनी या शिबिरात हिरीरीने भाग घेतला.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी जि. प सदस्या शांताताई कुमरे, रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, तालुका आरोग्य अधिकारी चेतन नाईकवार, निवृत्त वन संरक्षक सुभाष बडवे आणि व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर शिबिराचे आयोजन पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, राउंड ऑफिसर श्रीराम केकान, राजीव मेश्राम, वनरक्षक गणेश लामतुरे, दत्तात्रय विभूते, गजानन गरके, आकाश डुकरे, राजीव केंद्रे, आकाश जेंगठे, प्रथम संस्थेच्या भारती प्रजापती आणि इतर वनरक्षक यांनी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी उदघाटन कार्यक्रमाचे संचालन तथा उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …