Breaking News

*साटक येथे २० रक्तदात्यांनी केले रक्तदान* *साटक ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन*

*साटक येथे २० रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*साटक ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – साटक ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक – नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात २० रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला .


” देऊ मनुष्याला जिवाचे दान, चला करूया महा रक्तदान “ गुरूवार दिनांक २४ डिसेंबर २०२० ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ग्राप साटक सरपंचा सिमाताई यशवंतराव उकुंडे यांच्या शुभहस्ते व सदस्य तरुण बर्वे, दिपक मोहनकर, ग्रामसेवक शेळके व सोनवणे, साक्षोधन कडबे, शैलेश वाढई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुरूवात करण्यात आली असता शिबीरातील संकलित रक्त हे सुपर स्पेलालिटी रूग्णालयातील जनसामान्य गरजु रूग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी वापरले जाणार असल्याने रमाकांत मुरमुरे, यशवंत उकुंडे, सुरेंद्र मोहन कर, आशिष राऊत, आशिष देशमुख, कमलाकर गुडधे , नितेश कुंभलकर, अजय हिंगणकर, मुर्ती कट्टीपुडी, महादेव देशमुख, विजय भुते, संदीप गरवाल, शंकर डडुरे, आशिष डोकरीमारे, कैलास डवरे, प्रमोद मोहनकर सह २० रक्तदात्यांनी रक्तदान करुन मानवतेचा संदेश दिला. सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय नागपूुर येथील बीटीओ डॉ. मुकेश वाघमारे, संदीप महाकाळ कर, समाजसेवा अधिक्षक रूचिका बिरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वेणू तुरनकर, अधिपरिचारीका वैष्णवी राउत, अशोक गिरडे, राजु उप्पलवार यांनी उत्तमरित्या रक्त संकलन केले . कार्यक्रम यशस्वीते साठी प्राथ. आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिंगे, मंगेश, कल्पना, पुनम चोपकर, राजु तांबे, श्याम राहाटे व अपोलो क्लासेस, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी आयोज क व रक्तदात्यांचे आभार मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …