Breaking News

*साटक येथे ग्रामीण महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन*

*साटक येथे ग्रामीण महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहुउद्देशीय संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने साटक ग्राम पंचायत भवन परिसरात ग्रामीण असंघटित महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.


साटक येथे ग्रामीण महिलांचे दोन दिवसीय जनजागरूती प्रशिक्षण शिबीरांचे उद्घाटन साटक ग्राम पंचायत सरपंचा सिमाताई उकुंडे यांचा हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर चे अधिकारी प्रमोद रत्नपारखी, दामोधर रामटेके, गजराज देवियां, सुनिता रंगारी, वशिष्ठ यादव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रमोद रत्नपारखी यांनी बोर्ड द्वारे संचालित विविध कार्यक्रमाची माहीती देत विश्व व्यापी कोरोना महामारी पासुन बचावाच्या उपाय योजने वर मार्गदर्शन केले. दामोधर रामटेके यानी ग्रामिण महिला करिता सरकार व्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना विषयी सांगितले. उद्घाटक सिमाताई उकुंडे यांनी महिला सबलीकरणा करिता स्वंयसहायता बचत गटाच्या माध्यमातुन मिळणा-या विविध योजनाचा तसेच सरकार च्या विविध योजना आणि शिक्षण- प्रशि क्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन आर्थिक रूपाने सक्षम बनण्याचे आवाहन केले. संस्था सचिव अरविंद कुमार सिंह यांनी आपल्या प्रास्ताविका तुन पंचायत राज व ग्राम सभेचे महत्वा विषयी मार्गदर्शन केले. शिबीराचे सुत्र संचालन रिना जांगडे यांनी केले तर आभार छायाताई भुते यांनी मानले . या शिबीराचा लाभ महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन लाभ घेतला. यशस्विते करिता ग्राम संघ अध्यक्ष पुष्पा काउत्रे, सुनिता जांगडे, समता भुते, राधा हिंगे, कल्पना आदीने सहकार्य केले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …