Breaking News

*झोपलेल्या रस्ता प्रशासनाला छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान द्वारा प्रत्युत्तर*

*झोपलेल्या रस्ता प्रशासनाला छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान द्वारा प्रत्युत्तर*

 

तुमसर प्रतिनिधि -संकेत लांजेवार

तुमसर – कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील गतिरोधक प्रवाशांना एकाएकी लक्षात न येत असल्याने व वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन गतिरोधकाची रंगरंगोटी पुन्हा एकदा छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान व मॉर्निंग वॉक ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून करण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे या पूर्वी प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले त्या वर कुठलीही कारवाई न झाल्याने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी याच गतिरोधकांची रंगरंगोटी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली होती. पण रस्ता गतिरोधकाचे पेंट उपलब्ध नसल्याने साध्या पेंट द्वारे ते रंगविण्यात आल्याने ते लवकरच निघून गेले होते. पण अपघाताचे प्रमाण वाढल्याने प्रतिष्ठान करवी पुन्हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा रंगरंगोटी करण्यात आली. किमान या उपक्रमाने प्रशासन जागेल हि भाबडी आशा.. प्रस्तुत कार्यासाठी पुनश्च दत्ता ट्रेडर्स चे मालक श्री. हेमराज तलमले यांनी कुठलाही मोबदला न घेता साधनसामुग्री उपलब्ध करून दिली व पेंटरदादा श्री. दिलीप नखाते यांनी श्रमदान दिले. त्याबद्दल प्रतिष्ठान कडून त्यांचे खूप खूप आभार. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि. नितीन धांडे,विक्की साठवने,सुमित जिभकाटे,प्रतीक बुधे,अक्षय दमाहे,मनोज बोपचे, कोमल वानखेड़े मॉर्निंग वॉक ग्रुप चे श्री. बंडूभाऊ बांडेबुचे, श्री. वरखडे सर, श्री. शिवा दमाहे,श्री. मुकेश साखरवाडे श्री. प्रमोद देशमुख, श्री. मनोज डोंगरे,श्री. विकास मोटघरे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. अमोल उमरकर, प्रशांत वासनिक इत्यादींच्या श्रमदानातून कार्यास पूर्णत्व प्राप्त झाले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …