*काॅंग्रेस कमेटीचा १३७ वा स्थापना दिवस थटात साजरा*

*पारशिवनी तालुका काॅंग्रेस कमेटी द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुका कॉंग्रेस कमेटी व्दारे अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटी चा १३७ वा स्थापना दिवस थटात साजरा करण्यात आला.
मा.श्री राजेंद्र मुळक यांचे जन संपर्क कार्यालय येथे सोमवार दिनांक २८ डिसेंबर ला पारशिवनी तालुका कॉंग्रेस कमेटी व्दारे थटात करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री व अध्यक्ष कॉग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण राजेंन्द्र मुळक , तालुका अध्यक्ष दयाराम भोयर , बबनराव झाडे, हर्षवर्धन निकोसे, अशोक चिखले, राजु कुसुंबे, चेतन देशमुख, देविदास जामदार, प्रेम कुसुंबे, बंटी निबोंणे, प्रफुल कावळे, इंद्रपाल गोरले, भारत देशमुख, कमलाकर कोठेकर, प्रदीप दियेवार, प्रविण शेलारे सह अनेक कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज