Breaking News

*तालुकात दहा ग्राम पंचायत तुन १३ नामांकन भरले,आज ७ लोकानी फार्म जमा केले*

*तालुकात दहा ग्राम पंचायत तुन १३ नामांकन भरले,आज ७ लोकानी फार्म जमा केले*


पाराशिवनी तालुका प्रतिनिधी -कमलसिंह यादव

पाराशिवनी – तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ग्राम पंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. यासाठी ग्रा. पं. क्षेत्रातील हौशी मंडळी आपले नशीब अजमावणार आहेत. परंतु, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या व सातव्या दिवशी एकही नामांकन पत्र दाखल झालेले नसल्यामुळे सरपंच आरक्षणाला फटका बसणार का? असा प्रश्न निर्माण होत असून, त्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.

याआधी जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. मताची मदत व्हावी म्हणून पॅनल उभे करण्याची आवश्यकता सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटायची. सदस्यांमधून सरपंच निवडीची प्रक्रिया होत असल्याने पद पदरात पाडून घेण्यासाठी ऐन तेन प्रकारे आटापिटा करीत सदस्य निवडून आणण्याची जबाबदारी सरपंच पदाचे उमेदवार घेत होते. सन २0२0 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य निवडणूक झाल्यानंतर सरपंचांचे आरक्षण जाहीर होईल. त्यामुळे सदस्य निवडणुकीत उतरविण्यास कोणी पुढे धजत नाही. मात्र, ८ डिसेंबरला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार संभाव्य उमेदवारांनी जय्यत तयारी केली होती. विधानमंडळाच्या अधिवेशनात सरपंच पदाचे आरक्षण हे सदस्य निवडीनंतर करावे, असे ठरल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळेच की काय ग्रा. पं. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्याआज च्या दिवशी पर्यत एकुण १३ ही नामांकन पत्र दाखल झालेले आहे आज ७ नामांकन जमा केले.यात ईटगाव येथुन १नामांकन, पिपळा ४ नामांकन ,निमखेडा ३ नामांकन  ,बोरी ४ नामांकन ,सुवरधरा येथुन१नामाकन असे एकुण १३नामाकन भख्यात आले तर आमगाव,नवेगाव खैरी, खंडाळा,खेडी,माहुली या गावातुन एक ही आवेदन नाही आले.

दि.२५, २६ व २७ ला सार्वजनिक सुट्टय़ा होती व आता फक्त दोन दिवस दि. २९,३0 डिसेंबरपर्यंतच नामांकनपत्र दाखल करावयाचे असल्याने इच्छुक उमेदवारांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे. कारण कधी नेटवर्क तर कधी विजेचा फटका बसू शकतो. त्यातच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पॅनल कोण लढविणार, किती व कोण पैसे खर्च करणार? असा प्रश्न गावपुढार्‍यांच्या चर्चेतून दिसून येत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …