*विविध मागण्याबाबत मंच चे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे विविध सुविधा उपलब्ध व कन्हान नदी वरील पुलिया दुरुस्त करण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी शहरात व जवळ च्या छोट्या मोठ्या गावात गेल्या खुप वर्षापासुन बरेच समस्या असल्याने नागरिकांन पुढे उभे झाले असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांचा नेतृत्वात उपजिल्हाधिकारी यांना भेटुन विविध समस्या बाबत चर्चा करुन तातडीने तोडगा काढुन प्राथमिक आरोग्य केंद्र.कन्हान. येथे विविध सुविधा उपलब्ध व कन्हान नदी वरील पुलिया दुरुस्त करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी उपजिल्हाधिकारी यांना एका निवेदना द्वारे केली आहे .
कन्हान – पिपरी शहराला लागुन जवळपास तीस गावाचा संपर्क जुडला असुन तीस ते चाळीस हजार लोकसंख्या राहत असल्या वर ही कन्हान शहराच्या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात रुग्णांन करिता विविध सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना तसेच नागरिकांना धावपड करावी लागत असुन प्राथमिक आरोग्य केंन्द्रात आज ही रुग्णांन करिता , सी.टी.स स्कॅन , एॅक्सरा मशीन , सोनोग्राफी रुम ची व्यवस्था , अपघात झालेल्या रुग्णांसाठी आॅपरेशन ची व्यवस्था रुम , रुग्ण भर्ती रुम , डाॅक्टरांसाठी क्वाटर रुम , अश्या अनेक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना तसेच नागरिकांना धावपड करावी लागत असुन रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास व अचानक पणे नागरिकांची प्रकृती बिघडल्यास वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यु होतो . त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे विविध सुविधा उपलब्ध करण्याची गजर पडली आहे .
तर दुसरीकडे ब्रिटिश काळीन कन्हान नदीच्या पुला ची वयोमर्यादा संपली असुन पुलावरुन आज ही जड वाहन जात असल्याने पुलाची रेलिंग टुटत असुन कधी पण या पुलावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वाढली असुन पी.डब्ल्यु.डी प्रशासन , तहसील प्रशासन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन , या कडे लक्ष केंन्द्रीत करत नाही आहे .
कश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कन्हान नदी पुलाची वयोमर्यादा संपल्या वर ही बिनधास्त पणे या पुला वरुन दहाचक्का ट्रक , बारा चक्का ट्रक , ट्रॅव्हल्स , बसेस गाड्या सह अनेक वाहन जात असल्याने पुलाची रेलिंग हळु हळु टुटत आहे अश्यावेळी हा पुलिया कधी पण कोसळु शकतो याची दाट शक्यता वाढली असुन या कडे स्थानिय प्रशासन व प्रशाससकीय अधिकारी या पुला कडे लक्ष देत नसल्याने बिनधास्त पणे जड वाहन या पुलावरुन जात असुन या पुलावरुन जड वाहनास बंदी लावण्याची गरज पडली आहे . या कन्हान नदी वरील पुलिया ला दुरुस्त करुन , रोलिंग लावावे व प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे रुग्णांकरिता विविध सुविधा उपलब्ध करावे . अश्या दोन मागण्यानबाबत कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच सचिव प्रदीप बावने यांचा नेतृत्वात उप जिल्हाधिकारी डॉ सौ सुजाता गंधे , यांना दिलेल्या दोन निवेदनातुन केली असुन याची प्रत मुख्यमंत्री व गृहमंत्री ला पाठविण्यात आली आहे .
निवेदन देतांनी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरिओम प्रकाश नारायण , सोनु खोब्रागडे , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार सहित आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज